Friday, December 8, 2023

नटसम्राट झाला पोरका! प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या आईचं दुःखद निधन

लोकप्रिय मराठी अभिनेते प्रशांत दामले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत दामले यांच्या आईचे दुःखद निधन झाले आहे. विजया दामले यांनी बुधवारी (6 सप्टेंबर) सकाळी 10च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजया दामले यांच्या जाण्याने संपूर्ण दामले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

विजया दामले (Prashant Damle mother) यांचे निधन त्यांच्या राहत्या घरी झाले. ही दुःखद घटना घडली त्यावेळी अभिनेते प्रशांत दामले हे नाटकाच्या प्रयोगासाठी परदेशी दौऱ्यावर होते. आईच्या निधनाची बातमी समजताच दामले यांची पावलं मुंबईच्या दिशेने रवाना झाली. विजया दामले यांच्या पार्थिवावर आंबोली येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांच्या वडीलांचे निधन झाले होते.

प्रशांत दामले यांच्या विषयी बोलायचं झालं तर, प्रशांत दामले ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. दिवसापूर्वी ते अमेरिकेत गेले होते. ते 7 सप्टेंबर ते 15 ऑक्टोंबर पर्यंत अमेरिकेत नाटकाचे प्रयोग सादर करण्यासाठी गेले होते. या नाटकातून मिळालेला पैसा ते शैक्षणिक निधीसाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

प्रशांत दामले यांनी आई आणि पत्नीच्या पाठिंबामुळे 1992 मध्ये पूर्णवेळ नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला होता. नाटकात काम करण्यास सुरुवात केल्यानंतर प्रशांत दामले यांनी चित्रपटांना जवळपास रामरामच ठोकला होता. त्यांनी रंगभूमीवर 12 हजार 500 नाटक सादर करण्याचा विक्रम गाठला आहे. पण आईच्या जाण्याने नटसम्राट कायमचा पोरका झाला आहे. (Famous actor Prashant Damle mother Vijaya Damle passed away sadly)

अधिक वाचा-
साऊथचे ‘अंबानी’ म्हणून ओळखले जातात मामूट्टी, वकिली सोडून धरली होती अभिनयाची कास
काळीज तोडणारी बातमी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

हे देखील वाचा