Thursday, September 28, 2023

“आपल्याच देशातील लोकांचा द्वेष” फॅन्ड्री फेम राजेश्वरी खरातची ओपेनहायमरच्या ‘त्या’ सीनवर प्रतिक्रिया

मागील अनेक दिवसांपासून सतत चर्चेत असणारा आणि प्रतिक्षीत असा ख्रिस्तोफर नोलन यांचा ‘ओपेनहायम’ चित्रपट प्रदर्शित झाला. अनेक महिन्यांपासून नोलन यांच्या या सिनेमाची हवा होती. मात्र सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमातील एका विशिष्ट दृश्याबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. अणुबॉम्बचे जनक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट यांची कहाणी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. त्या दृश्यावर आता कलाकारांच्या देखील प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

सिनेमातील एका इंटिमेट सेक्स सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन करताना दाखवण्यात आलं आहे. दरम्यान सोशल मीडियावर सिनेमातील या दृश्यावर तर टीका होत आहे. जे. रॉबर्ट ओपेनहायमरला हिंदू महाकाव्याबद्दल मोठे आकर्षण होते. या चित्रपटात ओपेनहायमरच्या भूमिकेत असलेल्या सिलियन मर्फीला एका आक्षेपार्ह सीनमध्ये तो भगवद्गीता वाचताना दाखवण्यात आल्यामुळे मोठा वादंग उठला आहे. या वादावर अनेक मत ऐकायला पाहायला मिळत आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02YPBFT7CcBcvFVFLbpC3xL18azcCnvsns8KZhfGCPy4ZEPLTe1Nqrp9a33BAPuWAMl&id=100044631000266&mibextid=Nif5oz

यावरच आता मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री फॅन्ड्री फेम राजेश्वरी खरातने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे मत व्यक्त केले आहे. राजेश्वरीने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना मांडल्या आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, ” Oppenheimer “
हिन्दू-मुस्लिम, धर्म, जात-पात, रंग इत्यादि विषयांमध्ये लोक एकत्रित येऊन दंगे मोर्चे आणि काय काय करतात, पण या गोष्टींमुळे आपण आपल्याच देशातील लोकांचा द्वेष करत आलोय.
आज बाहेर देशातील काही लोकांनी आपल्या धार्मिकतेचा अपमान केला आहे, यावर कोणी जास्तं काही बोलेनात.
सर्वांना विनंती आहे की या प्रकरणाचा तीव्र निषेध करा आणि या सिनेमाचा योग्य तो निर्णय लागावा ही जबाबदारी सरकारने लवकरात लवकर घ्यावी, असे राजेश्वरी खरातने म्हटले आहे.”

दरम्यान आक्षेपार्ह सीनमध्ये अभिनेत्री आपल्याला टॉपलेस दिसते आणि आणि तिने तिच्यासमोर भगवद्गीता धरली आहे. सिनेमातील अभिनेता सिलियन मर्फी हा एका भगवद्गीतेमधील एका श्लोकाचा अर्थ तिला सेक्स करताना सांगत आहे. या अशा सीनवर मोठा आक्षेप घेतला जात आहे.

हे देखील वाचा