‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतने शोधली कोरोना लस घेण्याची नवीन पद्धत; एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल


बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत नेहमीच सोशल मीडियावर झळकत असते. ‘बिग बॉस १४’मध्ये धमाल केल्यानंतर आता राखी पॅपराजींची आवडती बनली आहे. कोरोना काळातही ती कोणत्या ना कोणत्या ठिकाणी स्पॉट होते. ती जिथे जाईल तिथे आपल्या मजेशीर अंदाजाने सर्वांना हसवते. मग ते भाजी घेताना असो किंवा कॉफी घेताना. अशातच आता सर्वजण कोरोनाची लस घेताना दिसत आहेत. यामध्ये राखी सावंत कशी मागे राहील? राखीनेही कोरोनाची लस घेण्याची नवीन पद्धत शोधली आहे. तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. (Actress Rakhi Sawant Sing A Song While Taking Her First Corona Vaccine Dose)

नुकतेच राखीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती कोरोनाची पहिली लस घेताना खूपच घाबरत असते. त्यादरम्यान तिने आपले गाणेही प्रमोट केले आहे. राखीने गाणे म्हणत कोरोनाची लस घेतली आहे. राखी व्हिडिओत म्हणते की, तिच्या येणाऱ्या गाण्याचे नाव आहे ‘तेरे ड्रीम में मेरी एन्ट्री.’ व्हिडिओत राखी म्हणते की, तिला भीती तर नाही वाटणार ना? ती आपले आगामी गाणे गाऊ शकते का? व्हिडिओतील तिचे एक्सप्रेशन्स अगदी पाहण्यासारखे आहेत. अशातच आता तिचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

राखी सावंतच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट  आणि लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. अशामध्ये विंदू दारा सिंगने राखीच्या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, “तुमच्या हातात कोविशिल्डची एन्ट्री.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “तुम्ही प्रत्येक परिस्थितीत कमाल आहात राखी.” आणखी एका चाहत्याने लिहिले की, “तुम्ही जगातील सर्वात भारी कॉमेडियन आहात.”

‘बिग बॉस १४’नंतर आता राखी सोशल मीडियावर धमाल करत आहे. ती नेहमीच तिचे मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. राखीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘ना तुम जानो ना हम’, ‘१९२०’, ‘मैं हूं ना’, ‘मस्ती’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.