Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

नुसता राडा! रश्मी देसाईचा ‘हा’ लूक पाहून तुम्हीही व्हाल घायाळ, केला बोल्ड अंदाजातील फोटो शेअर

आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजेच रश्मी देसाई. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्यामुळे तिची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या हॉट फोटोंमुळे ती चर्चेचा विषय बनत असते. तसेच तिला सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल देखील केले जाते. नुकताच तिने तिने तिचा हॉट लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

रश्मीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. चाहते तिच्या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. यात तिने वेगवेगळ्या पोझ देऊन प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. या फोटोला आता पर्यंत 1 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे.

रश्मीने 2006 साली ‘रावण’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. तसेच ‘ये लम्हे जुदाई के’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने टीव्ही मालिकेमध्ये काम करून नाव कमवले. तिने ‘उतरन’, ‘दिल से दिल तक’, ‘नागिन 4’, ‘भाग्य का जहरीला खेल’ या सीरिअल्समधे काम केले आहे.

या व्यतिरिक्त ती अनेक रिऍलिटी शोमध्ये देखील स्पर्धक होती. तिने ‘जरा नच के दिखा’, ‘झलक दिख ला जा’, ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिये’, ‘बिग बॉस 13’ यामध्ये भाग घेतला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावणारी ‘सपना चौधरी’, तिच्या ‘तेरे ठुमके’ गाण्याला आजही मिळतेय प्रेक्षकांची पसंती

-भोजपुरी गाण्याचा जलवा! सुपरस्टार राकेश मिश्राचं नवीन गाणं यूट्यूबवर करतंय धमाल; एकदा पाहाच

-‘सैयां जी’ गाण्यावर थिरकली निया शर्मा, पण ‘मजा नाही आली ताई’ म्हणत युजर्सने उडवली खिल्ली

हे देखील वाचा