×

Condemned The Killing | रवीना टंडन आणि निर्माते मनीष मुंद्रा यांनी बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षच्या हत्येचा केला निषेध

अनेक दिवसांपासून देशात वेगळेच वातावरण सुरू आहे. हिजाबच्या वादावर दररोज कोणत्या ना कोणत्या बातम्या येत आहेत. या बातमीने संपूर्ण देश चिंतेत आहे. अलीकडेच कर्नाटकातच एका २३ वर्षीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर वेगळीच खळबळ उडाली आहे. या हत्येबद्दल अनेक बड्या लोकांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे. त्याचवेळी त्या मुलाच्या हत्येवर अनेक सेलिब्रिटी न्यायाची मागणी करत आहेत. आता या यादीत बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे नाव जोडले गेले आहे.

रवीनाने (Raveena Tandon) तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची मागणी केली आहे. या यादीत केवळ रवीनाच नाही, तर प्रसिद्ध चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा (Manish Mundra) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या दोन्ही सेलिब्रिटींनीही या हत्येचा निषेध केला आहे. या कामगारावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर उडाली खळबळ
कर्नाटकच्या राजधानीत हिजाब प्रकरणावरून वाद वाढत आहे. बेंगळुरूपासून सुमारे २५० किमी अंतरावर असलेल्या काही महाविद्यालयांमध्ये हिजाबच्या वादावरून गोंधळ निर्माण झाला होता. या प्रकरणाला या वादाशी जोडले जात आहे. बजरंग दलाचा २३ वर्षीय कार्यकर्ता हर्ष याच्यावर रविवारी (२० फेब्रुवारी) बाराठी कॉलनीतील रवि वर्मा लेनमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात हर्षचा मृत्यू झाला. हर्षच्या मृत्यूनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. हत्येचे कारण लगेच कळू शकले नाही. या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सोमवारी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली होती.

रवीना टंडन आणि मनीष मुंद्रा यांनी सोशल मीडियावर ‘या’ हत्येचा केला निषेध
या घटनेवर रवीनानेही ट्विटरवर चालणाऱ्या जस्टिसच्या हॅशटॅगमध्ये तिची भूमिका नोंदवली. तिने ट्विटरवर #JusticeForHarsha असे लिहिले आहे. त्याचवेळी चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट केले आणि लिहिले की, “आम्ही #JusticeForHarsha ट्रेंड करतील आणि झोपून जातील. आम्ही काही नवीन मॉब लिंचिंगची वाट पाहू आणि आणखी काही ट्रेंडची वाट पाहू. जागे होण्याची वेळ आली आहे.”

कडेकोट बंदोबस्तात सोमवारी हर्षवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याचवेळी दगडफेक झाली. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान अनेक वाहनांना आग लागली असून, अनेक दुकानांचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणावरून तणाव वाढत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा :

 

Latest Post