Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड रवीना टंडनला मिळाला ऋषी अन् नीतू कपूर यांच्या लग्नाचा हरवलेला फोटो, अभिनेत्रीला ओळखणे फारच कठीण

रवीना टंडनला मिळाला ऋषी अन् नीतू कपूर यांच्या लग्नाचा हरवलेला फोटो, अभिनेत्रीला ओळखणे फारच कठीण

सोशल मीडियाने सर्वांनाच जवळ आणले आहे. लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत आता सर्वजण याचा वापर करताना दिसतात. कलाकारही यामध्ये मागे नाहीत. यात बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिचाही समावेश आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. तिने नुकताच एक जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे. हा फोटो ऋषी कपूर आणि नीतू कपूर (सिंग) यांच्या लग्नातील आहे. यामध्ये रवीनाही दिसत आहे. परंतु पटकन तिला ओळखणे फारच कठीण होईल.

रविना या फोटोत हसताना दिसत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत तिने लिहिले की, “हिरा मिळाला, परंतु थोडा उशिरा. जूही बब्बर हा फोटो शोधण्यासाठी धन्यवाद. चिंटू काका आपल्या आत्मचरित्रासाठी मला या फोटोबद्दल विचारत असायचे. माहिती नाही मी हा फोटो कुठे हरवला होता. आता मिळाला आहे. तर ही मी आहे, जी चिंटू काकांसोबत त्यांच्या लग्नात उभी आहे. काश मला हा फोटो आधीच मिळाला असता.”

रवीनाने शेअर केलेला फोटो पाहून चाहते भावुक झाले आहेत. तिच्या फोटोवर चाहते जोरदार प्रतिक्रिया करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “मला वाटते की, मॅडम हा सर्वात यादगार आणि प्रेमळ शूट आहे. जूही मॅडमला धन्यवाद. त्यांनी हा क्षण शोधला. तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.” रवीना टंडनच्या या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

मागील वर्षी ३० एप्रिल, २०२० रोजी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यातून अद्यापही ते बाहेर आलेले नाहीत. त्यांचे चाहते आणि कुटुंबीय नेहमीच त्यांचे जुने फोटो शेअर करत असतात.

रवीना टंडनला आली शूटिंगची आठवण
|रवीनाने नुकतेच आपल्या शूटिंगच्या दिवसांची आठवण काढत एक फोटो शेअर केला होता. तिने शूटिंग संपल्याचा फोटो शेअर करत लिहिले होते की, “अरनायकच्या शूटिंगचा शेवटचा दिवस. फेब्रुवारीमध्ये सर्व चेहरे आनंदित झाले आहेत. गँग, ऍक्शन आणि मस्तीच्या दिवसांची आठवण येत आहे. चांगले दिवस लवकरच परत येतील. मला हे माहिती नव्हते की, मी आपल्या कामाला इतके मिस करेल. हाहाहा नेहमीच कामामध्ये ब्रेकची वाट पाहत असायचे आणि आता महामारीमध्ये ब्रेक संपण्याची वाट पाहत आहे. हे सर्वही संपेल.”

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच पॅन इंडिया चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर २’ मध्ये झळकणार आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. रवीनानेही फर्स्ट लूक शेअर केला आहे. ती चित्रपटात एका राजकारणी व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री बनूनही रिंकू राजगुरूने आजपर्यंत केले नाही ‘हे’ काम; तुम्हीही म्हणाल, ‘हे कसं काय बरं!’

-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

-पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खानसोबत लग्नबंधनात अडकणार होती रेखा, अभिनेत्रीची आई कुंडली घेऊन थेट पोहोचली होती ज्योतिषीकडे

हे देखील वाचा