अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात २०२० आणि २०२१ ही वर्षे अशी होती, जी ती क्वचितच विसरू शकणार असेल. कारण या वर्षांत तिने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तिने कधीही विचार केला नसेल असा काळ तिने पाहिला. सुशांत प्रकरणात अं’मली पदार्थ प्रकरण समोर आल्यानंतर तिने अनेक रात्री तुरुंगात काढल्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ती सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे आणि कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत आहे. रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा सोशल मीडियावर सोशल जगताशी संबंधित गोष्टी तिच्या फोटो आणि व्हिडिओंसह शेअर करत असते. अलिकडेच तिने मुलींना सल्ला देणारी एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या खूप व्हायरल होत आहे.
रिया मुलींना दिला सल्ला
रिया (Rhea Chakraborty) आता हळुहळू जुन्या आठवणींमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिच्या आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी चाहत्यांचाही पाठिंबा तिला मिळत आहे.
‘ही’ गोष्ट सोशल मीडियावर दाखवली बोलून
रियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने मुलींसाठी एक नोट लिहिली आहे. तिने लिहिले की, “मी सर्व मुलींना एक आठवण करून देणार आहे. तुम्ही आहात तशा सुंदर आहात. इंस्टाग्राम ब्युटी आणि फिल्टर्सच्या फंदात पडू नका. मला माहित आहे की, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता, पण तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटले पाहिजे. खूप प्रेम आणि प्रकाश, आरसी.”

रिया हे वर्ष सकारात्मक करण्याचा करत आहे प्रयत्न
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रिया स्वतःला बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तिला आणि तिच्या कुटुंबाला भूतकाळातील सर्व दु:ख विसरून नव्याने सुरुवात करायची आहे. ती धार्मिक पुस्तकांमध्ये हरवून जाते आणि तिला नेहमीच सकारात्मकतेने जीवन जगायला आवडते. रिया हे वर्ष सकारात्मक करण्याचा प्रयत्न करत आहे.
हेही वाचा :
- चक्क चाहत्याने मुलाला रामायणातील ‘राम’ उर्फ अरुण गोविल यांच्या ठेवले पायाशी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
- ‘मुलाला मराठी बोलता येते’ या गोष्टीसाठी सागरिका घाटगे आणि झहीर खान यांच्या लग्नाला मिळाली होती परवानगी
- शरद मल्होत्राने ‘या’ अभिनेत्रीला आठ वर्षे केले होते डेट, ‘या’ कारणामुळे गेला नात्याला तडा










