Thursday, June 13, 2024

‘आय लव यू’ म्हणत मितालीने सिद्धार्थ चांदेकरचा ‘तो’ फोटो केला शेअर; पहा फोटो

मराठी चित्रपट सृष्टीतील चाॅकलेट बाॅय म्हणून ओळखला जाणार अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर होय. सिद्धार्थ सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आपला अभिनय, सूत्रसंचालन, सोशल मीडियावरील लिखाण या गोष्टींमुळे त्याने चाहत्यांच्या मनात विषेश स्थान निर्माण केले आहे. सिद्धार्थ सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असतो. टीव्ही आणि चित्रपटांप्रमाणे त्याचा सोशल मीडियावर देखील प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

सिद्धार्थ आणि मिताली मयेकर हे क्युट कपल सोशल मीडियावर नेहनीटच चर्चेत येत असते. ते दोघेही त्यांचे फोटो आणि व्हिडोओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मिताली मयेकर ही देखील प्रसिध्द अभिनेत्री आहे. सिद्धार्थने मितालीसोबत 2021मध्ये लग्न केल. सिद्धार्थचा जन्म 14 जून 1991 रोजी झाला असुन तो पुण्यात जन्मला आहे.

सिद्धार्थच्या (iddharth Chandekar) वाढदिवसा निमित्त मितालीने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना मितालीने सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच तिनेे कॅप्शनमध्ये लिहीले की, “तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! Idiotic Piece of Pear, आय लव्ह यू.” तर मितालीने टाकलेली स्टोरी री-शेअर करीत सिद्धार्थने त्यावर ‘माझे माकड’ असे लिहीले आहे. तसेच तिला मितालीला धन्यवाद म्हटले आहे.

या फोटोमध्ये सिद्धार्थ व्हिडिओ काॅलवरून बोलताना दिसत आहे. या दोघांच्या स्टोरी पाहून चाहते वेगवेगळा अंदाज बांधत आहेत. तसेच ते दोघे लांब राहूण वाढदिवस का साजरा करत आहेत. असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्याचवेळा चाहते सिद्धार्थला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत.

सिद्धार्थ विषयी बोलायच झाल तर, 2016 मध्ये वजनदार, पिंडदान आणि लॉस्ट एण्ड फाउंड या चित्रपटात झळकला होता.२०१८ मध्ये त्याचा गुलाबजाम हा चित्रपट चांगला गाजला. या चित्रपटाने खूप पुरस्कार जिंकले. त्यानंतर तो झिम्मा या चित्रपटात दिसला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी तोंडभरून कौतुक केले.

अधिक वाचा-
प्राजक्ता माळीने राज ठाकरेंसाठी लिहीली भन्नाट पोस्ट; म्हणाली, ‘तुमच्या आयुष्यातील..’
शिल्पा शेट्टीचा ‘ताे’ बाेल्ड फाेटाे व्हायरल, अभिनेत्री राखी सावंत कमेंट करत म्हणाली… 

हे देखील वाचा