Monday, July 15, 2024

धनुषच्या ‘या’ सिनेमाचा परदेशातही डंका! बनला अमेरिकेत सर्वाधिक कमाई करणारा तिसरा तमिळ चित्रपट

‘मारी भाई’ या नावाने लोकप्रियता मिळवणारा साऊथ सुपरस्टर धनुष याने यावर्षी बॉलिवूडमधील ‘अतरंगी रे’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये धनुष आणि सारा अली खान यांची जोडी पहिल्यांदाच झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. यानंतर धनुषने ‘थिरुचित्रम्बलम’ या चित्रपटामध्ये काम केले. त्याच्या या चित्रपटाने जगभर प्रसिद्धी मिळवली आहे. जाणून घेऊया या चित्रपटाच्या कमाईविषयी…

साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) याच्या ‘थिरुचित्रम्बलम’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. या चित्रपटाचे दिग्गदर्शन मिथुन जवाहर यांनी केले असून तमिळनाडू बॉक्स ऑफिसवर 75 कोटींचा अकडा पार केला आहे. या चित्रपटाने देशातच नाही, तर परदेशातही आपला डंका वाजवला आहे. जगभरात या चित्रपटाने 100 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. धनुषच्या करिअरमधील सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

यूएस मध्येही वाजला तामिळचा डंका
धनुषचा तमिळ भाषेतील ‘थिरुचित्रम्बलम’ हा चित्रपट कॉमेडी आणि रोमँटिकने भरलेला आहे. या चित्रपटाने भारतातच नाही, तर अमेरिकेच्या चित्रपटगृहातही धमाल केली आहे. धनुषचा हा चित्रपट ‘विक्रम’ आणि ‘बीस्ट’ सारख्या चित्रपटांना मागे टाकून अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर 2022चा सर्वाधिक कमाई करणारा तिसऱ्या क्रमांकाचा तमिळ चित्रपट बनला आहे.

चित्रपटाबद्दल माहिती
‘थिरुचित्रम्बलम’ या चित्रपटामध्ये धनुषने एका डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत सिनेमात नित्या मेनन, राशी खन्ना, प्रकाश राज, भारतीराज आणि प्रिया भवानी शंकर हे देखील चित्रपटाचा भाग आहेत. मिथुन आणि धनुष यांनी चौथ्यांदा एकत्र केले आहे. याआधी या दोघांनी ‘कुट्टी’, ‘यारदी नी मोहीनी’ आणि ‘उत्तम पुथिरन’ यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे.

कोणत्या चित्रपटामध्ये दिसणार ही जोडी
त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर घनुष हा त्याच्या आगामी तेलुगू-तमिळ ‘वाथी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्य व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव ‘सर’ असे ठेवले आहे. वेंकी अतलुरी या चित्रपटाचे दिग्गदर्शन करत असून धनुष एका प्रोफेसरच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’मधील जुन्या ‘अंजली भाभी’चे असे झालेत हाल, व्हिडिओ पाहून तुमचीही उडेल झोप
सोप्पा नाहीये सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा सिनेप्रवास; वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी दिले होते ऑडिशन
बोल्ड ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वाढवला इंटरनेटचा पारा, ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांनाही घातली भुरळ

हे देखील वाचा