Thursday, July 18, 2024

साऊथच्या अभिनेत्रीने निर्मात्याशी थाटला संसार; नवरदेवाला पाहताच नेटकरीही म्हणाले, ‘हे कसं शक्य?’

साऊथ इंडस्ट्रीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. चित्रपट निर्माते रवींद्र चंद्रशेखर यांनी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मी हिच्याशी साताजन्माची गाठ बांधली आहे. त्यांनी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले आहेत. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करताच सोशल मीडियाव जोरदार व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये.

खरं तर, अभिनेत्री महालक्ष्मी (Mahalakshmi) हिचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचे लग्न अनिल याच्यासोबत झाले होते. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, लग्नानंतरच त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे अभिनेत्रीने वेगळे होण्याचा मार्ग अवलंबला. असे असले, तरीही तिला आता रवींद्र चंद्रशेखर (Ravindra Chandrashekhar) यांच्या रूपात जोडीदार मिळाला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, दोघांचीही भेट ‘विदियम वरई काथिरू’ या सिनेमादरम्यान झाली होती. यादरम्यानच त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले की, “आयुष्यात तुम्ही भेटल्यामुळे मी खूप भाग्यवान आहे. तुम्ही माझे आयुष्य प्रेमाने भरले आहे. माझे तुमच्यावर प्रेम आहे अम्मू.”

हे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या जोडप्याला नवीन लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, काहींना अभिनेत्रीच्या या लग्नावर विश्वासच बसत नाहीये. एका युजरने अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “खरंच… हा सीरियलचा प्रोमो आहे का?” दुसऱ्या एकाने लिहिले की, “हे कसं काय शक्य आहे?” आणखी एकाने लिहिले की, “अपेक्षा करतो की, हा केवळ एक सिनेमा असेल.” याव्यतिरिक्त अनेक युजर्स हा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

अभिनेत्री महालक्ष्मी हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘वाणी राणी’, ‘चेल्लामय’, ‘ऑफिस’, ‘अरसी’, ‘थिरु मंगलम’, ‘यामिरुक्का बयामेन’ आणि ‘केलाडी कनमनी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. दुसरीकडे, रवींद्र चंद्रशेखर यांनी ‘नालनम नंदिनीयम’, ‘सुट्टा कढाई’, ‘नत्पुना एन्नानु थेरियुमा’ आणि ‘मुरुंगकाई चिप्स’ यांसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सर्वाधिक चर्चेत असलेल्या बॉयकॉटबद्दल हे काय बोलून गेली स्वरा? म्हणाली, ‘सुशांतच्या निधनानंतर आलियाला…’
बॉलिवूडमधील ‘हा’ दिग्गज आहे अनन्या पांडेचा गुरू, म्हणाली ‘माझा प्रत्येक चित्रपट…’
दु:खद! प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

हे देखील वाचा