Thursday, April 3, 2025
Home मराठी बिनधास्त सई ताम्हणकरने केले लेटेस्ट फोटोशूट शेअर, पाहताच चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस

बिनधास्त सई ताम्हणकरने केले लेटेस्ट फोटोशूट शेअर, पाहताच चाहत्यांनी पाडला लाईक्सचा पाऊस

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar). ती नेहमीच तिच्या स्टाईलने आणि एका अनोख्या अंदाजाने सगळ्यांमध्ये चर्चेत असते. अत्यंत साध्या भोळ्या भूमिकांपासून ते अत्यंत बोल्ड आणि डॅशिंग भूमिकेपर्य‌ंत तिने पात्रं‌ निभावली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर तिचा एक वेगळाच ठसा उमटला आहे. सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सई नेहमीच‌ तिचे व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना तिच्याबद्दल माहिती देत असते. तिच्या वेगवेगळ्या फोटो शूटमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना देखील तिचा प्रत्येक अंदाज खूप आवडतो. अशातच पुन्हा एकदा अभिनेत्रीने चाहत्यांना घायाळ करणारे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नुकताच सई ताम्हणकरने तिचा लेटेस्ट फोटोशूट तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने गुलाबी रंगाची पॅन्ट आणि फ्लोरल टॉप परिधान केला आहे. अभिनेत्रीने सुंदर असा मेकअप करून तिचे केस मोकळे सोडले आहेत. अभिनेत्रीने कानात छोटेसे कानातले घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. या अंदाजात सई ताम्हणकर प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. त्यासह अभिनेत्रीने एकापेक्षा एक कातील अंदाजात पोझ देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहते प्रचंड लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे. तिने ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हे तिचे कमालीचे नाव कमावले आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने नुकतेच ‘मिमी’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात तिने क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा