Monday, April 15, 2024

काही मिनिटांसाठी कोट्यवधी रुपये घेणाऱ्या अभिनेत्री समंथाचा पहिला पगार ऐकूण व्हाल थक्क

सिने जगतातील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मानधनाची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसत असतात. त्यामुळेच या जगतात पैसा आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळते असेच म्हणले जाते. आणि यामध्ये अभिनेत्री जर समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) सारखी लोकप्रिय असेल तर काही बोलायलाच नको. अभिनेत्री समंथा ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अवघ्या काही मिनीटांच्या जाहिरातीसाठी करोडो रुपये घेणारी अभिनेत्री अशी तिची खास ओळख आहे. मात्र सध्या सर्वात जास्त मानधन घेणारी समंथाच्या पहिल्या पगाराची आठवण मात्र खूपच रंजक आहे. किती होता या लोकप्रिय अभिनेत्रीचा पगार चला जाणून घेऊ.

प्रत्येक व्यक्तीसाठी, त्याचा पहिला पगार आणि नोकरी म्हणजे अविस्मरणीय प्रसंग असतो. यानंतर तो तो कितीही मोठा झाला तरी चालेल पण कोणतीही व्यक्ती आपला पहिला पगार आणि नोकरी कधीच विसरू शकत नाही. साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने तिच्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला आहे, जो जाणून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या यशाच्या शिखरावर असणारी लोकप्रिय अभिनेत्री समंथा चित्रपटात येण्यापूर्वी ती हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करायची. याचा खुलासा समंथाने तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला होता.

समंथाने इंस्टाग्रामवर प्रश्नोत्तराचा खेळ तिच्या चाहत्यांसोबत खेळला होता. जिथे चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आणि तिनेदेखील चाहत्यांना प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहत्याने तिला तिच्या पहिल्या पगाराबद्दल विचारले, ज्यावर तिने तिच्या आठवणी सांगितल्या आहेत. समंथाने सांगितले की, “ती 10वी किंवा 11वीमध्ये शिकत होती. जेव्हा तिला पहिला पगार म्हणून 500 रुपये मिळाले होते. तिने एका हॉटेल कॉन्फरन्समध्ये वेट्रेस म्हणून काम केले. त्यानंतर ही रक्कम देण्यात आली होती.”

दरम्यान समंथाने 2010मध्ये ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिला खरी प्रसिद्धी ‘द फॅमिली मॅन’ या वेबसिरीजमधून समंथाला जगभरात ओळख मिळाली. यामध्ये तिची नकारात्मक भूमिका सर्वांनाच आवडली. यानंतर समंथाने ‘पुष्पा’मध्ये 3 मिनिटांचे आयटम सॉंग केले. या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी तिने 5 कोटी रुपये घेतले होते.(actress samantha ruth prabhu first sallery)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
समंथा रुथ प्रभूची दहावीची मार्कशीट झाली व्हायरल, गणिताचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क
सुर्यफुलासाेबत गाैरी नलावडेचं लेटेस्ट फाेटेशूट, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा