Thursday, September 28, 2023

अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देत सना खानने गुपचूप केले लग्न; तर अपहरण केल्याचाही लावण्यात आला होता अभिनेत्रीवर आरोप

अभिनयाच्या क्षेत्राला राम राम करणारी आणि ‘बिग बॉस ६’ची माजी स्पर्धक सना खान गेल्या अनेक खूपच चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिचे लग्न होय. गेल्या वर्षी सना खानने अचानक बॉलिवूड विश्वाला पूर्णविराम देणार असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिने अचानक लग्न देखील केले होते. सना खानचा जन्म1987 मध्ये धारावी, मुंबई येथे झाला. सना आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज या लेखात जाणून घेऊयात तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या रोचक गोष्टी.

सनाचे वडील कन्नूर येथील मल्याळी मुस्लिम आहेत. त्याचबरोबर तिची आई सईदा मुंबईची रहिवासी आहे. तिने आपले प्राथमिक शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. तिने या क्षेत्राची सुरुवात जाहिरातींपासून केली. हिंदी व्यतिरिक्त सनाने तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. 2005 मध्ये सनाने कमी बजेट असलेल्या ‘यही है हाय सोसायटी’ या अडल्ट चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले होते. यासोबतच ती टीव्ही जाहिरातींमध्येही व्यस्त असायची. ‘बॉम्बे टू गोवा’, ‘धन धना धन गोल’ या चित्रपटांमध्ये तिने विशेष भूमिका निभावल्या आहेत. परंतु तिला हिंदी चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे तिने साऊथ चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2014 मध्ये सना सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात दिसली. इतकेच नव्हे तर ‘वजह तुम हो’ आणि ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ यांसारखे चित्रपट तिने केले. (Actress Sana Khan gave a full stop to her acting career in this superhit film)

 

‘बिग बॉस’चा होती भाग
साल 2012 मध्ये सना खानने ‘बिग बॉस’ सीझन 6 मध्ये भाग घेतला होता. ती तिच्या उत्तम खेळाच्या जोरावर फायनलिस्ट देखील बनली होती. तर टीव्ही शोबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झलक दिखला जा 7’, ‘खतरों के खिलाडी 6’, ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’, ‘एंटरटेनमेंट की रात’ आणि ‘किचन चॅम्पियन’ मध्ये दिसली होती.

 

अपहरणाचा आरोप
सना तिच्या कामासाठी कमी आणि वादांमुळेच जास्त चर्चेत असते. सना खानवर अपहरणाचा आरोप देखील लावण्यात आला होता. 15 वर्षाच्या मुलीने सना खानवर आरोप केला होता, सनाच्या चुलत भावाशी लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिचे अपहरण करण्यात आले.

मेल्विन लुईससोबत ब्रेकअप
गेल्या वर्षी सना खानचा तिचा बॉयफ्रेंड मेल्विन लुईससोबत ब्रेकअप झाला होता, त्यानंतर तिने सोशल मीडियावर मेल्विनवर फसवणुकीचे आरोप केले होते. सनाने सांगितले की, मेल्विनशी ब्रेकअप झाल्यानंतर ती इतकी खचली होती, की तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या.

आशका गोराडियाशी मैत्री

बिग बॉस दरम्यान, सना खानची आशका गोराडियासोबत मैत्री झाली होती. कालांतराने दोघींची मैत्री वेगळेच रूप घेत गेली. त्यानंतर दोघींच्या मैत्रीवर प्रश्न देखील उपस्थित होऊ लागले. ‘बिग बॉस’ दरम्यान या दोघींचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

हेही नक्की वाचा-
‘तेरे नाम’ हिट झाल्यानंतर ‘या’ दाेन चित्रपटातून भूमिका चावलाला का केले रिप्लेस? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
‘या’ कारणामुळे सना खानने सोडले बॉलिवूड, इंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा