Tuesday, September 26, 2023

‘तेरे नाम’ हिट झाल्यानंतर ‘या’ दाेन चित्रपटातून भूमिका चावलाला का केले रिप्लेस? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

शाहिद कपूर आणि करीना कपूर खान यांचा 2007मध्ये आलेला ‘जब वी मेट‘ हा चित्रपट आजही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटासाठी करिना ही पहिली पसंती नव्हती? याचा खुलासा स्वत: भूमिका चावला हिने केला आहे. भूमिकाने अलीकडेच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. अशात अभिनेत्रीने खुलासा केला की, तिला ‘जब वी मेट’ मध्ये रिप्लेस करण्यात आले, ज्यामुळे तिला खूप वाईट वाटले.

खरे तर, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत भूमिकाला तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दल दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यास सांगितले होते. यादरम्यान, अभिनेत्रीने आठवण करून दिली की, ‘ती इम्तियाज अली दिग्दर्शित रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही.’ तिने खुलासा केला की, ‘तिने याआधीच बॉबी देओलच्या विरूद्ध चित्रपट साइन केला होता, ज्याचे नाव आधी ‘ट्रेन’ होते.’

भूमिकाने सांगितले की, “प्रॉडक्शन हाऊस बदलल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. हिरो बदलून शाहिदला कास्ट करण्यात आले. त्यानंतर, तिची जागा आयशा टाकियाने घेतली, परंतु नंतर टीमने प्रामुख्याने शाहिद कपूर आणि करीना कपूर यांना कास्ट केले.” भूमिका म्हणाली की, “तिने ‘जब वी मेट’साठी एक वर्ष वाट पाहिली आणि कोणताही चित्रपट साईन केला नाही, पण चित्रपट रखडला, ज्यामुळे तिला खूप वाईट वाटले. मात्र, तिने याचा फारसा विचार केला नाही आणि करिअरमध्ये ती पुढे गेली.”

भूमिका चावला सांगते की, ‘जेव्हा तिने सलमान खानसोबत ‘तेरे नाम’मध्ये काम केले होते तेव्हा तो चित्रपट हिट झाला होता, पण या चित्रपटाच्या यशानंतरही तिला अनेक चित्रपट गमवावे लागले होते.’ भूमिकाने सांगितले की, ‘तिने ‘लगे रहो मुन्ना भाई’ देखील असाच साइन केला होता, पण नंतर ही भूमिका विद्या बालनकडे गेली. असेच घडत गेले आणि तिचा संघर्ष चालूच राहिला.’ असे भूमिकाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

भूमिकाच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले तर, तिने ‘तेरे नाम’, ‘सीता रामम’, ‘किसी का भाई किसी की जान’ या सारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(bollywood actress bhumika chawla being replaced after tere naam in jab we met)

हेही वाचा-
‘या’ कारणामुळे सना खानने सोडले बॉलिवूड, इंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा
सलमान खानसोबत रोमान्स करून चर्चेत आलेली भूमिका चावला, योग गुरुसोबतच थाटला संसार

हे देखील वाचा