आहा… कडकच ना! सपना चौधरीच्या नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; देसी अन् वेस्टर्न लूकमध्ये दिसतेय एकदम झक्कास


‘हरियाणवी डान्सिंग क्वीन’ म्हणजे कोण? असा प्रश्ना जर कोणालाही विचारला, तर त्याच्या तोंडून फक्त एकच नाव निघेल, ते म्हणजे सपना चौधरी होय. सुरुवातीला फक्त आपल्या राज्यामध्ये ओळखल्या जाणाऱ्या सपनाने आपल्या डान्सने देशातील कानाकोपऱ्यात आपली ओळख तयार केली आहे. तिचे डान्स पाहण्यासाठी चाहते तोबा गर्दी करत असतात. तिचे डान्स व्हिडिओही सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होत असतात. अशातच आता सपनाचे एक नवीन हरियाणवी गाणे यूट्यूबवर धमाल करत आहे. यामध्ये सपना नोकरानीपासून ‘बांगरो’ बनून ठुमके लावत आहे.

सपनाच्या नवीन गाण्याचे नाव ‘बांगरो (Bangroo)’ आहे. हे गाणे यूट्यूबवर नुसता राडा करत आहे. कोरोनामुळे स्टेजपासून दूर राहणारी सपना आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन म्युझिक व्हिडिओ घेऊन येत आहे. सपनाचे हे नवीन गाणे ठेठ हरियाणवी भाषेतील आहे. या गाण्यात तिच्यासोबत अभिनेता मनीष शर्माही आहे. (Actress Sapna Choudhary New Haryanvi Song Bangaroo Latest Dance Viral)

गाण्यात नोकरानीपासून बांगरो बनलेल्या सपनाच्या अदा पाहण्याजोग्या आहेत. गाण्यात सपना देसी आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही लूकमध्ये दिसत आहे. दोन्ही अंदाजात सपना खूपच सुंदर दिसत आहे. सपनाच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणेही चांगलेच गाजत आहे. या गाण्याला आनंद पांचाळ आणि मनीषा शर्मा यांनी आपला आवाज दिला असून हे गाणे ४७ रेकॉर्ड्स या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या व्हिडिओला दोन दिवसातच १४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यापूर्वी सपनाचे ‘घुंघरू’ गाणे प्रदर्शित झाले होते, ज्याला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळाली होती. त्या गाण्याला रेणुका पंवारने आवाज दिला आहे.

सपना आपल्या जबरदस्त डान्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. तिने हरियाणाच्या ऑर्केस्ट्रा पार्टीतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ती हरियाणा आणि जवळपासच्या राज्यांमध्ये रागिनीच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागली. यानंतर तिने हळूहळू संपूर्ण देशात आपला डंका वाजवला. याव्यतिरिक्त तिने ‘बिग बॉस १३’मध्येही सहभाग नोंदवला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ चॅप्टर २’ ला मिळतोय भरभरून प्रतिसाद; तब्बल ‘इतके’ व्ह्यूज मिळवून यूट्यूबवर केलाय राडा!

-ब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ

-उर्वशी रौतेलानंतर आता मुनमुन दत्तानेही केली ‘मड बाथ’; जॉर्डनमधील फोटो होतायेत व्हायरल


Leave A Reply

Your email address will not be published.