Friday, April 19, 2024

‘चणे के खेत मैं चका चक’ सारा अली खानने केला डान्सिंग दिवा माधुरी दीक्षितसोबत केला भन्नाट डान्स

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची (Sara Ali Khan) प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते. कधी फोटो शेअर करून, तर कधी डान्स व्हिडिओ करूनही अभिनेत्री चाहत्यांची मने जिंकते. आता साराने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती धक धक गर्ल माधुरी दीक्षितसोबत  (Madhuri Dixit) डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सारा तिच्या आगामी ‘अतरंगी रे’ या चित्रपटातील ‘चका चक’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघींचाही मनमोहक अंदाज चाहत्यांना खूप आवडत आहे.

साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर माधुरी दीक्षितसोबतचा तिचा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. साराने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “चणे के खेत मैं चका चक किया. माधुरी दीक्षित मॅडमने संपूर्ण आयुष्य प्रेरित केले आणि आता मी त्यांच्यासोबत डान्स करून खूप आनंदी आहे. याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप आभार.” यापूर्वी साराने अनन्या पांडेसोबत ‘चका चक’ गाण्यावर डान्स केला होता.

हा व्हिडिओ ४ लाख २० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये साराने लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे, तर माधुरी देखील लाल आणि सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान करून अतिशय सुंदर दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर माधुरी दीक्षितने नुकताच ‘डान्स दिवाने’ शोचे परीक्षण केले आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ चित्रपटात दिसली होती. त्याचवेळी, सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत दिसला होता. यानंतर तिने ‘लव्ह आज कल’ आणि ‘सिम्बा’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. ती लवकरच अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी’मध्ये दिसणार आहे. सारा शेवटची ‘कुली नंबर १’मध्ये वरुण धवन सोबत दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अशोकमामांसोबत ‘गंमत जंमत’ चित्रपटात झळकलेल्या ‘चारुशीला साबळे’ नंतर इंडस्ट्रीतून अचानक झाल्या गायब, आज आहे…

-तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा