मद्यधुंद अवस्थेत सुटले साराचे नियंत्रण, रेस्टॉरंटमध्ये जाताना गार्डला केला चुकीचा स्पर्श; व्हिडिओ व्हायरल

0
118
Sara-Ali-Khan
Photo Courtesy: Twitter/varunkapurz

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी कुटुंबाच्या प्रसिद्धीचा फायदा न घेता स्वत:च्या मेहनतीवर नाव कमावले. या अभिनेत्रींमध्ये सारा अली खान हिचाही समावेश होतो. सारा तिच्या गोड स्वभावासाठी ओळखली जाते. तिचे फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांच्या पसंतीस पडतात. मात्र, आता तिचा असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दावा केला आहे की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या साराने रेस्टॉरंटमध्ये घुसताना गेटवर उभ्या असलेल्या गार्डला विचित्र पद्धतीने स्पर्श केला आणि ती पुढे गेली. त्यांचे असे म्हणणे आहे की, जर असे कुणी पुरुषाने केले असते, तर त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावला गेला असता. या प्रकरणाबद्दल आता सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.

खरं तर अभिनेत्री सारा ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत धडपडत चालताना दिसत आहे. सारा तिची मैत्रीण आणि अभिनेत्री शर्मिन सहगल (Sharmin Segal) हिच्यासोबत मुंबईच्या एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाली. साराला पाहताच तिच्यावर कॅमेऱ्याच्या लाईट्स चमकू लागल्या. सारा व्यवस्थित चालत नव्हती आणि तिची मैत्रीण शर्मिन तिला आधार देताना दिसत होती.

साराच्या कृत्यावर भडकले नेटकरी
सारा अली खान मागील काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेत्री शर्मिनसोबत रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करत असते. त्यावेळी ती दरवाजावर उभ्या असलेल्या गार्डला स्पर्श करते आणि पुढे जाते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “लोक विचारतात की, बॉलिवूडला बॉयकॉट का केले जात आहे? हे आहे त्याचे कारण. ड्रगवूड आमच्या पिढीला बर्बाद करत आहे.”

गार्डला नेटकऱ्यांचा पाठिंबा
या व्हिडिओवर लोक आपला राग व्यक्त करत आहेत. एकाने म्हटले की, “बिचाऱ्या सुरक्षारक्षकासोबत चुकीचे घडले. जर हे कृत्य एखाद्या पुरुषाने केले असते, तर त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावला असता.” इतकेच नाही, तर अनेकांनी गार्डचे समर्थन करत पुरुषांचे रक्षण करणाऱ्या कायद्याची गरज असल्याचेही म्हटले. दुसरीकडे, अनेकजण म्हणत आहेत की, साराने काहीही चुकीचे केले नाही.

साराबद्दल बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘अतरंगी रे’ या सिनेमात झळकली होती. यानंतर आता ती ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीनेच लावला शारीरिक अत्या’चाराचा आरोप, फसवणूक अन् ब्लॅकमेल केल्याचाही खुलासा
परिस्थिती काय, बोलतोय काय! राजूंच्या अंत्यसंस्कारात चाहता कॉमेडियनसोबत सेल्फीसाठी उतावळा, व्हिडिओ व्हायरल
राजूंच्या निधनामुळे अमिताभ बच्चनही गेले खचून; म्हणाले, ‘माझा आवाज ऐकून त्याने डोळे उघडलेले, पण…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here