Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड गणेश मंदिरात सारा अन् अमृता या मायलेकींनी लावली हजेरी; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

गणेश मंदिरात सारा अन् अमृता या मायलेकींनी लावली हजेरी; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडते. कधी फोटो शेअर करून आणि कधी डान्स व्हिडिओ करूनही अभिनेत्री चाहत्यांची मने जिंकते. सारा तिच्या पुढील चित्रपट ‘लुका छुपी २’ चे इंदोरमध्ये शूटिंग करत आहे. यादरम्यान ती इंदोरमधील शूटिंगमधून वेळ काढून फिरायलाही जात आहे. अलीकडेच, सारा तिची आई अमृता सिंगसोबत महाकालच्या मंदिरात गेली होती. आता तिने इंदोरच्या सर्वात प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात पूजा केली आहे. यावेळी तिच्यासोबत तिची आईही दिसली.

साराने (Sara Ali Khan) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये खजराना मंदिराचे काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये ती मंदिरात गणेशाची पूजा करताना दिसत आहे. यासोबतच तिने मंदिराच्या पुजाऱ्यासोबत फोटोही काढला आहे. फोटो शेअर करत तिने “जय भोलेनाथ” असेही लिहिले आहे.

Sara Ali Khan
Photo Courtesy Instagramsaraalikhan95

हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला

खजराना मंदिरात पोहोचल्यानंतर साराने आधी गणेशाचे दर्शन घेतले आणि नंतर विधीपूर्वक पूजा केली. तिने तिच्या आगामी ‘लुका छुपी २’च्‍या चित्रपटाच्‍या यशासाठी श्रीगणेशाकडे मागणी देखील घातली आहे.

Sara Ali Khan Photo
Photo Courtesy Instagramsaraalikhan95

मंदिराचे मुख्य पुजारी पंडित अशोक भट्ट यांनी सांगितले की, सारा अली खान संध्याकाळी ६ वाजता खजराना गणेश मंदिरात पोहोचली. ती १०-१५ मिनिटे येथे थांबली. तिच्यासोबत एक गार्डही होता.

Sara Ali Khan Photo
Photo Courtesy Instagramsaraalikhan95

यावेळी तिने कॅम्पसमध्ये बांधलेल्या सर्व मंदिरांना भेटी देऊन देवाचे दर्शन घेतले. तसेच गणेशासोबत सेल्फी काढला. सारा नियमितपणे भारतातील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना करते. गेल्या वर्षी तिने आणि जान्हवी कपूर केदारनाथला जाऊन तिथल्या मंदिरात पूजा केली होती.

विकी कौशल देखील सध्या सारा अली खानसोबत इंदोरमध्ये ‘लुका छुपी २’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. लक्ष्मण उटेरिया या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत दिसला होता. यानंतर तिने ‘लव्ह आज कल’ आणि ‘सिम्बा’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

हेही वाचा-

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा