Sunday, April 19, 2026
Home बॉलीवूड अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, ‘भूत बंगला’ने दुसऱ्या दिवशी 60 कोटींचा टप्पा केला पार

अक्षय कुमार अभिनीत ‘भूत बंगला’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, ‘भूत बंगला’ने दुसऱ्या दिवशी 60 कोटींचा टप्पा केला पार

अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रकार दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. आडवांस बुकिंग आता सुरू झाले असून हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र 16 एप्रिल 2026 पासून प्रेव्हीव झाले होते. तर आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे जाणुन घेवुयात.

अक्षय कुमार (kumar)अभिनीत ‘भूत बंगला’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने 12.05 कोटींच्या कमाईसह सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी 55 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, दुसऱ्या दिवशी अंदाजे 20 कोटींच्या कमाईसह, चित्रपटाची भारतातील एकूण कमाई 40 कोटींच्या पुढे गेली आहे. चित्रपटाने जगभरात 60 कोटींची कमाई केली आहे. या हॉरर कॉमेडीने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर 2’ चा चित्रपटाच्या कमाईवर कोणताही परिणाम झालेला नाही.

प्रियदर्शन दिग्दर्शित आणि अक्षय कुमार, वामिका गब्बी अभिनीत  ‘भूत बंगला’ या दरम्यान, दोन दिवसांनंतर, चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन 42 कोटींवर पोहोचले आहे. तर  भारतातील 42 कोटी आणि परदेशातील 18.50 कोटींसह, चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन 60.50 कोटींवर पोहोचले आहे. रविवारी या आकड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बिग बॉस मराठी 6 चे टॉप 5 फायनलिस्ट ठरले, तर आजच होणार ग्रँड फिनाले

 

 

हे देखील वाचा