Sunday, April 19, 2026
Home टेलिव्हिजन बिग बॉस मराठी 6 चे टॉप 5 फायनलिस्ट ठरले, तर आजच होणार ग्रँड फिनाले

बिग बॉस मराठी 6 चे टॉप 5 फायनलिस्ट ठरले, तर आजच होणार ग्रँड फिनाले

बिग बॉस मराठी हा एक लोकप्रिय रियालिटी शो आहे. तर आता बिग बॉस मराठीचा 6 वा सीजन सुरु आहे. हा सीजन 11 जानेवारी 2026 रोजी सुरु झाला होता. आता याचा महाअंतिम सोहळा रविवार, 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. मागील पर्वा प्रमाणेच हे पर्व गाजले. यातील टास्कने आणि उत्तम मनोरंजनाने हा सीजन गाजला. तर यातील कोणता स्पर्धक जिंकण्याच्या आघाडीवर आहे. हे जाणुन घेउयात.

सध्याच्या ऑनलाइन व्होटिंगच्या ट्रेंडनुसार, तन्वी कोल्ते आणि राकेश बापट यांच्यात अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. दोघेही सध्या आघाडीवर आहेत. राकेशला त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे व्होटिंगमध्ये फायदा मिळत आहे, तर तन्वीचा मोठा चाहतावर्ग अजूनही निकालावर प्रभाव टाकू शकतो. त्यानंतर अनुश्री माने आहे, तर विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद अजूनही शर्यतीत मागे आहेत. मात्र, रेडिटवरील एका व्हायरल पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की विशालने कदाचित हा सीझन आधीच जिंकला आहे. ज्यामुळे अंतिम सोहळ्यापूर्वीच्या चर्चांना आणखी जोर चढला आहे. तर या सीजनचा महाअंतिम सोहळा प्रसारित झाल्यानंतरच अंतिम निकाल कळेल.

बिग बॉस मराठी 6 च्या या टॉप 5 फायनलिस्टमध्ये तन्वी कोल्ते, राकेश बापट, अनुश्री माने, दिपाली सय्यद आणि विशाल (vishal)कोटियन यांचा समावेश आहे. तसेच या सीजन मध्ये जो कोणी जिंकेल त्याला विजेता ट्रॉफीसोबत 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळेल. तर यामध्ये वृत्तानुसार, राखीने बक्षीस रकमेत 7 लाख रुपये जोडल्याने हि रक्कम वाढली आहे. या बिग बॉस मराठी 6 चा विजेता आज रात्री रितेश देशमुख जाहीर करतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘धुरंधर’ची स्वस्त नक्कल केल्याबद्दल पाकिस्तानी शो ट्रोल; युझर्स म्हणाले, ‘आता तर हा शो नक्कीच १००० कोटींचा होणार…’

 

हे देखील वाचा