Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन शहनाझच्या हृदयात अजूनही जिवंत आहे सिद्धार्थ, आठवण काढत कॅमेऱ्यासमोरच रडली ढसाढसा

शहनाझच्या हृदयात अजूनही जिवंत आहे सिद्धार्थ, आठवण काढत कॅमेऱ्यासमोरच रडली ढसाढसा

प्रसिद्ध अभिनेत्री शहनाझ गिल हिला कोणत्याही परिचयाची गरज नाही. शहनाझने तिच्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. ‘बिग बॉस‘चा भाग बनल्यानंतर तिच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली. त्यानंतर सर्वत्र तिच्याच चर्चा रंगू लागल्या. अशात अभिनेत्रीने युट्यूबवर नुकताच आपला एक चॅट शो सुरू केला आहे. यामध्ये आतापर्यंत राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना हे दोन कलाकार पाहुणे म्हणून आले आहेत. आयुष्मानसोबतचा आगामी एपिसोड नुकताच लाईव्ह झाला. त्यातील एक भाग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पहिल्यांदाच सिद्धार्थ शुक्ला याची आठवण काढत शहनाझ गिल कॅमेऱ्यासमोर रडली.

अभिनेत्री शहनाझ गिल (Shehnaaz Gill) हिने यावेळी सांगितले की, सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्याबद्दल सार्वजनिकरीत्या बोलण्यास ती का घाबरते. तसेच, अशी कोणती गोष्ट आहे, जी तिला यापासून रोखते, हेही तिने सांगितले.

सिद्धार्थच्या आठवणीत ढसाढसा रडली शहनाझ
शहनाझच्या टॉक शोचा दुसरा एपिसोड वेळापूर्वी तिच्याच युट्यूबवर लाईव्ह झाला होता, ज्यात तिने आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) याची मुलाखत घेतली. यादरम्यान एका सेगमेंटमध्ये शहनाझ आणि आयुष्मान बोलत होते की, कशाप्रकारे कलाकार आपल्या भावना झाकून ठेवतात. यावेळी शहनाझ म्हणाली की, तिच्या आयुष्यातही खूप काही भावूक होते, पण तिने याबद्दल कुणाशीही चर्चा केली नाही. ती सर्वकाही दाबून ठेवते. याच गोष्टी बोलत असताना अचानक शहनाझच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि ती रडू लागली. रडताना शहनाझही चकित झाली आणि लगेच कॅमेरा सुरू असतानाच तिने टिशू मागितले आणि शो पुढे चालवला.

…म्हणून शहनाझ करत नाही सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य
या मुलाखतीदरम्यान आयुष्मानसोबत बोलताना शहनाझ गिलने सांगितले की, ती तिच्या भावना दाबून ठेवते. कारण, सोशल मीडियाच्या या जगात ट्रोलिंग हे खूप सामान्य आहे. ती म्हणते की, सिद्धार्थ गेल्यानंतर तिने याबद्दल सार्वजनिक ठिकाणी कधीच चर्चा केली नाही. कारण, लोक तिला जज करतात आणि असेही म्हणतात की, ती सिद्धार्थबद्दल यासाठी बोलते कारण तिला ‘सांत्वन’ हवे असते.

यापूर्वीही एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात शहनाझने पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना पहिल्यांदा सिद्धार्थचे नाव घेतले होते. तसेच, त्याला धन्यवादही दिला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
धक्कादायक! अयोध्याच्या हॉटेलमधून भोजपुरी अभिनेत्रीचे दागिणे- मोबाईल चोरी, पोलिसांकडून तपास सुरू
ब्रेकिंग! साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज निर्माता हरपला, कमल हासनही हळहळले

हे देखील वाचा