Monday, June 24, 2024

सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवसापूर्वी अनाथाश्रमात पोहोचली शहनाझ गिल, चाहते म्हणाले ‘तू परी आहेस जिला…’

एकेकाळी मनोरंजन विश्वाचा चमकणारा चेहरा असलेला सिद्धार्थ शुक्ला आता फक्त आठवणीतच राहिला आहे. सिद्धार्थचे २ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. सिद्धार्थने आपल्या अभिनयाने आणि मनमोहकतेने चाहत्यांची मने जिंकली होती. पण असे काहीही न बोलता तो निघून जाईल याची कल्पनाही कोणाला नव्हती. त्याच्या जाण्याचे प्रत्येक चाहत्याला दु:ख आहे, पण त्याच्या कुटुंबाच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही.

शहनाझ गिल पोहोचली अनाथाश्रमात
सिद्धार्थच्या आयुष्यात आई, बहीण आणि चाहत्यांशिवाय एक मुलगीही होती, जी मैत्रिणीपेक्षा जास्त होती. ‘बिग बॉस सीझन १३’मध्ये सिद्धार्थ आणि शहनाझ यांची भेट झाली आणि तिथून त्यांची मैत्री वाढली. सिद्धार्थचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. तो आज या जगात असता, तर त्याने यावर्षी ४१ वा वाढदिवस साजरा केला असता. आता अलीकडेच, शहनाझ अमृतसरमधील एका अनाथाश्रमात दिसली होती, ज्यानंतर तिचे फोटो पाहून चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत.

सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी शहनाझ अमृतसरमधील एका अनाथाश्रमात दिसली. यावेळी तिने मुलांसोबत वेळ घालवला आणि गप्पाही मारल्या. यावेळी तिच्यासोबत तिची आई देखील होती. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि चाहते तिचे प्रचंड कौतुक करत आहेत.

अनेक युजर्सने शहनाझचे एक मजबूत मुलगी म्हणून वर्णन केले, तर अनेकांनी तिच्या प्रेमळ हृदयाची प्रशंसा केली. एका युजरने लिहिले की, “सना तू एक परी आहेस जिला संपूर्ण जग मिळायला हवे.” सिद्धार्थसोबतच्या शहनाझच्या जोडीला सिडनाझ म्हणतात आणि सिद्धार्थ गेल्यानंतरही सिडनाझचे चाहते त्यांच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत. शहनाझला नेहमीच चाहत्यांचे प्रेम मिळते.

शहनाझ आणि सिद्धार्थच्या जोडीमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. सिद्धार्थ आणि शहनाझ लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या, पण या गुड न्यूजपूर्वीच ही धक्कादायक घटना घडली.

सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शहनाझची प्रकृती बिघडली होती. तिने बरेच दिवस खाणे-पिणेही बंद केले होते. सुमारे एक महिन्यानंतर, ती कामावर परतली आणि तिच्या चित्रपट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही आता प्रियांका चोप्राच्या पतीसोबत लावणार ठुमके, मिळाली ‘ही’ आंतरराष्ट्रीय संधी

-जीवे मारण्याची धमकी मिळताच कंगना रणौतने वादामध्ये ओढलं सोनिया गांधींचं नाव, म्हणाली, ‘जीव देईन, पण…’

-‘गॅंग्स ऑफ वासेपुर’ फेम अभिनेत्याने उरकून टाकले लग्न, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आनंदाचा धक्का!

हे देखील वाचा