Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

बाप रे! शिल्पा शेट्टीला राग अनावर, रागाच्या भरात रोहित शेट्टीवरच फोडली काचेची बाटली

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. शिल्पा ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मग ती तिच्या सौंदर्याबद्दल असो किंवा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. त्याचबरोबर शिल्पाला डान्सची किती आवड आहे हे सांगायची गरजच नाही. शिल्पा तिचे नवनवीन डान्स व्हिडिओ शेअर करून सोशल मिडियावर चर्चेत असते. तिच्या प्रत्येक डान्स मुव्ह्जने चाहत्यांचे मने जिंकत असते. मात्र ही अभिनेत्री आता चांगलीच संतापली आहे. ज्यामुळे ती आता चर्चेत आली आहे.

शिल्पाला एका मोठ्या दिग्दर्शकाचा चित्रपट हवा आहे आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार आहे. अशा परिस्थितीत रोहित शेट्टी (Rohit Shetty) जेव्हा ‘इंडिया गॉट टॅलेंट’ शोमध्ये पोहोचला तेव्हा त्याने रोहितला चित्रपटासाठी विचारणाही केली. पण रोहितने तिचे ऐकले नाही तेव्हा शिल्पाने असे काही केले की, शोमधील सर्वजण दंग झाले आणि चाहत्यांना विश्वास बसेना.

शिल्पा शेट्टीने रोहित शेट्टीच्या हातावर फोडली बाटली
चित्रपट निर्माता रोहित शेट्टी या आठवड्यात ‘इंडिया गॉट टॅलेंट’ (India’s Got Talent) शोमध्ये पाहुणा म्हणून येणार आहे. या शोचा प्रोमो समोर आला आहे. त्याचवेळी शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये शिल्पा असे काही करताना दिसत आहे ज्याची तिच्याकडून कोणाला अपेक्षा नाही. शिल्पाने रोहित शेट्टीला बोलावते, पण तो बादशाहसोबत बोलण्यात व्यस्त असतो. खूप हाक मारूनही रोहित ऐकत नाही तेव्हा शिल्पाने काचेची बाटली हातात धरून रोहितच्या हातावर फोडली. हे पाहून सर्वांनाच धक्का बसतो. त्याचवेळी, आश्चर्यचकित आणि अस्वस्थ रोहित शेट्टीच्या तोंडातून अचानक बाहेर पडते “पागल है क्या?”

त्याचवेळी शिल्पाने बाटली फोडताच ती जोरजोरात ओरडू लागली, मला चित्रपट हवा आहे. त्याचवेळी शिल्पाचे हे रूप पाहून बादशाह देखील घाबरतो. शिल्पा शेट्टी सध्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ चे परीक्षण करत आहे. मागच्या वर्षी ती ‘हंगामा २’ मध्ये दिसली होती. तर आता तिने तिच्या पुढील प्रोजेक्टची देखील घोषणा केली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘सुखी’ (Sukhi) या चित्रपटात शिल्पा दिसणार आहे. ज्याचा प्रोमो आणि पहिली झलक शिल्पाने तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. या प्रोमोवरून हे स्पष्ट झाले आहे की, शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा एका अतिशय धमाल प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा – 

हे देखील वाचा