‘खतरों के खिलाडी’ या शोनंतर रोहित शेट्टी आणि लाफ्टर क्वीन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचीया यांच्यात खास बॉंडिंग तयार झाले आहे. रोहित या दोघांसोबत रोहित नेहमीच मजा-मस्ती करताना दिसत असतो. रोहित सध्या ‘खतरों के खिलाडी’ नाही तर ‘हूनरबाज’ या शोचे होस्टिंग करणाऱ्या भारती सिंग आणि हर्ष लिंबाचीया हा यांना भेटला.
यावेळी रोहित शेट्टीने प्रेग्नेंट भारती सिंगला एक खास गिफ्ट दिले आहे. परंतु गिफ्ट देण्याआधी त्याने भारती आणि हर्षची खूप मस्करी केली. त्याने भारतीला दोन टेडी बियर आणि एक लहान मुलांचे खेळणे गिफ्ट दिले आहे.
हे गिफ्ट पाहून हर्ष खूप झाला आणि रोहितला म्हणाला की, “ही गोष्ट नेहमी भारती करत असते. पण यावेळी मी करणार आहे.” त्यानंतर हर्ष रोहितकडे येतो आणि त्याला किस करतो. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
भारती आणि हर्षने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ते आई-बाबा होणार आहेत याची माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ते दोघेही आता त्यांच्या येणाऱ्या बाळाची वाट बघत आहेत. दोघेही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार आहेत.
हेही वाचा :
- धनश्री वर्माच्या नवीन व्हिडिओने घातला धुमाकूळ, ‘गंगुबाई काठीयावाडी’च्या लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- सिजेन खान ४४ व्या वर्षी अडकणार लग्नबंधनात, गर्लफ्रेंडच्या हातची बिर्याणी खाल्यानंतर घातली थेट लग्नाची मागणी
- शेहनाझ गिलने साधला चाहत्यांशी संवाद, सिद्धार्थच्या आठवणीत चाहते पुन्हा एकदा झाले भावुक