कशी नशिबानं थट्टा आज मांडली! पतीच्या अटकेचा शिल्पा शेट्टीला फटका; अभिनेत्रीचा ‘सुपर डान्सर ४’मध्ये जाण्यास नकार


सध्या एक नाव चांगलंच चर्चेत आहे, ते म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा होय. राज कुंद्राला सोमवारी (१९ जुलै) रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्याला क्राइम ब्रांचने पॉर्न चित्रपट बनवल्यामुळे अटक करण्यात आली आहे. आता याचा फटका शिल्पा शेट्टीलाही बसताना दिसत आहे. शिल्पा सध्या डान्स रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत झळकत आहे. मात्र, आता या प्रकरणानंतर शिल्पाला शोमधून निरोप दिल्याचे वृत्त आहे.

माध्यमातील ताज्या वृत्तानुसार, शिल्पा या शोच्या आगामी एपिसोड्समध्ये दिसणार नाही. याला तिचा पती राज कुंद्राचे अटक केल्याचे कारण सांगितले जात आहे. स्पॉटबॉय वेबसाईटच्या वृत्तानुसार, ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या आगामी एपिसोडची शूटिंग आजपासून केली जाणार होती. मात्र, शेवटच्या क्षणी शिल्पाने सेटवर येण्यास नकार दिला आहे. तरीही शिप्लाने नकार देण्याचे कारण सांगितले नाही. राज कुंद्राच्या अटकेनंतर आज त्याला न्यायालयात दाखल केले जाणार आहे. त्यामुळेच शिल्पाने सेटवर जाण्यास नकार दिल्याचे म्हटले जात आहे. (Actress Shilpa Shetty Replaced By Karishma Kapoor From Super Dancer Chapter 4 For Few Days After Raj Kundra Arrested)

अशातच आता वृत्त आहे की, शोच्या आगामी एपिसोडमध्ये शिल्पाच्या जागी अभिनेत्री करिश्मा कपूर खास पाहुण्या परीक्षकाच्या रूपात दिसणार आहे. असे म्हटले जात आहे की, निर्मात्यांनी करिश्मा कपूर, गीता कपूर आणि अनुराग बासूसोबत शूटिंगही सुरू केली आहे. यापूर्वीही शिल्पाने मे महिन्यात शोमधून काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता. त्यावेळी शिल्पाच्या जागी मलायका अरोरा काही दिवसांसाठी परीक्षक म्हणून शोचा भाग बनली होती.

दुसरीकडे शिल्पाच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘हंगाम २’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मीझान जाफरी, परेश रावल, प्रणिता सुभाषही दिसणार आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली होती. यापूर्वी चित्रपटातील ‘चुरा के दिल मेरा २.०’ देखील प्रदर्शित करण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या

-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


Leave A Reply

Your email address will not be published.