Friday, May 24, 2024

रणबीर अन् आलियाने लेकीचे ठेवले खास नाव, आजी नीतू कपूर झाल्या भावूक

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट हिने अलीकडेच कॉफीच्या मगचा फोटो शेअर केला, ज्यावर ‘ममा’ लिहिले होते. तेव्हा चाहत्यांनी मुलीचा चेहरा दाखवण्याची मागणी सुरू केली. आजी नीतू कपूर, आजी सोनी राजदान, आजोबा महेश भट्ट मुलीच्या जन्मामुळे खूप आनंदी आहेत. मुलीच्या नावाबाबत बरीच कसरत सुरू आहे. आलियाच्या मुलीचे नाव शॉर्टलिस्ट करण्यात आल्याचे वृत्त आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt) 6 नोव्हेंबरला आई झाली तेव्हा वडील रणबीर कपूरसह संपूर्ण कुटुंबाने आनंद व्यक्त केला. आजकाल आलिया तिच्या राजकुमारीसोबत मातृत्वाच्या खास क्षणांचा आनंद घेत आहे. बाळाचे नाव जाणून घेण्यासाठी आणि चेहरा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, आलिया-रणबीरच्या मुलीचे नाव ठरले आहे, ज्याचे खास नाते आजोबा ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्याशी सांगितले जात आहे. ऋषी हयात असते तर, त्यांना आपल्या नातीनला पाहून खूप आनंद झाला असता. ऋषी एक जिंदादिल व्यक्ती होते, ज्यांचे हास्य आजही त्यांचे सहकारी कलाकार आणि कुटुंबातील सदस्यांना आठवते.

माध्यमातील वृत्तानुसार, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीचे नाव दिवंगत अभिनेता आणि मुलीचे आजोबा ऋषी कपूर यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया-रणबीर आपल्या मुलीचे नाव स्वतःच्या नावावर ठेवू इच्छित नाहीत. त्यामुळे भट्ट कुटुंब आणि कपूर कुटुंबीयांनी मिळून आलिया-रणबीरच्या छोट्या परीचं नाव फायनल केलं आहे.

रणबीर कपूरसोबतच आलिया भट्टनेही तिचे सासरे ऋषी कपूर यांच्या नावावरून तिच्या मुलीला नाव देऊन त्यांना श्रद्धांजली वाहली आहे. या नावावर सर्वांचे एकमत झाले आहे. आलिया लवकरच लेकीचे नाव चाहत्यांशी शेअर करणार आहे. आता चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की, या जोडप्याने ऋषी कपूरचे नाव कशाप्रकारे जोडले आहे. (bollywood actress alia bhatt and ranbir kapoor baby name shortlist neetu kapoor get emotional to know connection with rishi kapoor)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरेरे! रँप वॉकसाठी सजून आलेली पाकिस्तानी अभिनेत्री; पण पुढे जे झालं, त्यामुळे देशात उडवली गेली थट्टा

‘काम देण्याच्या नावाखाली अश्लील मागणी’, साजिद खानवर आणखी एका अभिनेत्रीचा गंभीर आरोप

हे देखील वाचा