मंगळवारी (दि. 15 ऑगस्ट) देशभरात 77वा स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला. यादरम्यान अनेक मोठे कलाकार आनंद साजरा करताना दिसले. मात्र, यादरम्यान शिल्पा शेट्टी हिने पोस्ट शेअर करताच, तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर अभिनेत्रीनेही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. चला तर, नेमकं काय प्रकरण आहे, जाणून घेऊयात…
शिल्पा शेट्टी का झाली ट्रोल?
झाले असे की, अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत शिल्पा पती राज कुंद्रा, आई आणि मुलगा वियानसोबत झेंडा फडकवताना दिसत आहे. या व्हिडिओत कुटुंबातील सर्व लोक राष्ट्रगीत गाताना दिसत आहेत. मात्र, शिल्पाला असे करणे महागात पडले. कारण, तिने झेंडा फडकवताना पायात बूट घातले होते.
अभिनेत्रीच्या पायात बूट पाहून चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला जोरदार ट्रोल केले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “बूट काढल्यानंतर झेंडा फडकवणे चांगले झाले असते.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “जर तिरंग्याचा सन्मान करता येत नाही, तर नाटकही करत नको जाऊ. तसंही देशाकडून तुला कोणतीच आशा नाहीये.”
View this post on Instagram
अभिनेत्रीचे सडेतोड प्रत्युत्तर
इंस्टाग्रामवर ट्रोलर्सची वाढती संख्या पाहून अभिनेत्रीने ट्रोलर्सला सडेतोड प्रत्युत्तर दिले. तिने लिहिले की, “माझा देश आणि झेंड्यासाठी माझा सन्मान हृदयातून येतो. प्रश्न उपस्थित करण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही.”
अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ (Shilpa Shetty Video) 47 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर 4 लाखांपेक्षा जास्त लाईक्सचाही पाऊस पडला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (actress shilpa shetty trolled badly for hoisting the tricolor wearing shoes actress gave a befitting reply)
महत्त्वाच्या बातम्या-
मन सुन्न करणारी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याचे कमी वयात निधन, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली
धक्कादायक! सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण; बेल्ट आणि बांबूच्या काठीने चोप दिल्यानंतर…