Tuesday, May 21, 2024

वयाच्या 48व्या वर्षी शिल्पा शेट्टीचे टोन्ड अॅब्स पाहून चाहते थक्क, व्हिडिओ एकदा पाहाच

बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नुकतीच गोरेगाव फिल्म सिटीमध्ये ‘इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10’च्या सेटवर दिसली. यावेळी अभिनेत्री खुपच सुंदर दिसत असून तिने पॅपराझींना अनेक पाेज देखील दिल्या. अशात तिची  स्टायलिश अदा आणि सुंदर ड्रेस चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला. त्याचबरोबर तिच्या टोन्ड अॅब्सनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमके काय व्हिडिओमध्ये? चला, जाणून घेऊया…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) सुंदर लाल रंगाचा ड्रेस परिधान करून सेटवर पोहोचली हाेती. यासाेबतच तिने मेकअपही केला हाेता. तसेच, केस बांधले होते, जे तिच्या साैंदर्यांत आणखीनच भर घालत हाेते. अशात अभिनेत्रीचा सेटवरील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये शिल्पा व्हॅनिटीमधून खाली उतरून हसत मीडियासमोर पोज देताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने चाहत्याने अभिनेत्रीचे काैतुक करत कमेंट बाॅक्समध्ये लिहिले, “ती खूप सुंदर आहे. तिचा ड्रेस खूप छान आहे.”, तर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी देखील शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकतीच शिल्पा शेट्टी 48 वर्षांची झाली आहे. मात्र, ती खूपच फिट आहे. ती नुकतीच सुट्टीवर गेली होती, ज्यादरम्यान तिने स्विमिंग सूट परिधान करून स्विमिंग पूलजवळ उभे राहून पोजही दिली. तिच्या या फाेटाेवर अनेकांनी मजेशीर कमेंट केल्या हाेत्या.

शिल्पा शेट्टी लवकरच ‘इंडियन पाेलिस फोर्स’मध्ये दिसणार आहे. ही तिची वेब सिरीज डेब्यू असेल. या सीरीजचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने यांनी केले आहे. याशिवाय ती कन्नड चित्रपट ‘केडी’मध्येही दिसणार आहे. सध्या शिल्पा किरण खेर आणि बादशाह यांच्यासोबत ‘इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10’चे शुटींग करत आहे. याआधीही शिल्पाने अनेक शोज जज केले आहेत. ती एक चांगली डान्सर म्हणूनही ओळखली जाते. तिचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते.(bollywood actress shilpa shetty toned abs video at the age of 48 fans reaction goes viral on social media)

अधिक वाचा- 
दीपिका-रणवीर पुन्हा एकत्र दिसणार पडद्यावर? अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करून वाढवली चाहत्यांची उत्सुकता
‘बिग बॉस 16’ मधील स्पर्धक श्रीजिता डे अडकली लग्न बंधनात, प्रियकरासाेबत दिल्या रोमँटिक पाेज

हे देखील वाचा