Saturday, September 30, 2023

मन सुन्न करणारी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याचे कमी वयात निधन, चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

हॉलिवूडमधून दु:खद बातमी समोर येत आहे. ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या डॅरेन केंट याचे कमी वयात निधन झाले आहे. तो फक्त 36 वर्षांचा होता. वृत्तांनुसार, केंट दीर्घ काळापासून दुर्मिळ आजाराने ग्रस्त होता. या आजाराशी दीर्घ काळ झुंज दिल्यानंतर त्याने शुक्रवारी (दि. 11 ऑगस्ट) जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर हॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच, आता प्रत्येकजण सोशल मीडियावर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.

कसे झाले निधन?
डॅरेन केंट (Darren Kent) याचे निधन 11 ऑगस्ट रोजी झाले होते. मात्र, याची पुष्टी मंगळवारी (दि. 16 ऑगस्ट) ट्विटरवरून करण्यात आली. टॅलेंट एजन्सीने ट्वीट केले की, “जड अंत:करणाने आम्हाला हे सांगावे लागत आहे की, आपला प्रिय मित्र आणि क्लाएंट डॅरेन केंट याचे शुक्रवारी निधन झाले. त्याचे कुटुंबीय आणि सर्वात चांगले मित्र त्यांच्यासोबत होते. या कठीण प्रसंगी आम्ही त्याच्या कुटुंबासोबत आहोत. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो मित्रा.”

‘या’ गंभीर आजाराने होता ग्रस्त
माध्यमांतील वृत्तांनुसार, डॅरेन दीर्घ काळापासून ऑस्टियोपोरोसिस, अर्थरायटिस आणि स्किन डिसऑर्डरने ग्रस्त होता. त्याची ही स्किन डिसऑर्डर दुर्मिळ होती. डॅरेन याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 2008मध्ये ‘मिरर्स’ या हॉरर सिनेमातून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर त्याने एमी पुरस्कार विजेत्या ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) या वेबसीरिजमध्येही काम केले. या सिनेमात त्याने स्लिव्हर्सची भूमिका साकारली होती. त्याने 2023च्या ‘डंगऑन एँड ड्रॅगन्स ऑनर अमंग थीव्स’ या सिनेमात काम केले होते.

लेख आणि दिग्दर्शकही होता डॅरेन
अनेक सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारा डॅरेन अभिनेत्यासोबतच लेखक आणि दिग्दर्शकही होता. त्याने सन 2021मध्ये आलेल्या ‘यू नो मी’ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले होते. (shocking Game of Thrones Actor Darren Kent Passes Away read here)

महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण; बेल्ट आणि बांबूच्या काठीने चोप दिल्यानंतर…
भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या 4 सुपरस्टार्सच्या सिनेमांमध्ये आघाडीवर कोण? ‘हा’ सिनेमा सपशेल फ्लॉप

हे देखील वाचा