एकीकडे सनी देओल याचा सिनेमा ‘गदर 2‘ कमाईचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे, तर दुसरीकडे अक्षय कुमार याचाही ‘ओएमजी 2‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. या दोन सिनेमात जबरदस्त स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी 11 ऑगस्टला रिलीज झाले होते. ‘गदर 2’सोबत अक्षयचा ‘ओएमजी 2’ सिनेमादेखील छप्परफाड कमाई करत आहे. ठीकठाक सुरुवात केल्यानंतर आता सिनेमाने 77व्या स्वातंत्र्यदिनी वीकेंडपेक्षाही जास्त कमाई केली आहे.
अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमासाठी मंगळवारचा (दि. 15 ऑगस्ट) दिवस खास ठरला. सिनेमाने 12 कोटींपेक्षाही जास्त कमाई केली. रंजक बाब अशी की, सिनेमाने सोमवारी ओपनिंग डेपेक्षाही जास्त कमाई केली. खरं तर, शुक्रवारी पहिल्या दिवशी सिनेमाने 10.26 कोटी रुपये छापले होते. तोच आता 15 ऑगस्टला 77व्या स्वातंत्र्यदिनी (77th Independence Day) सिनेमाने शानदार कमाई केली आहे. चला तर, ‘ओएमजी 2’ सिनेमाची पाचव्या दिवसाची कमाई जाणून घेऊयात…
‘ओएमजी 2’ने पाचव्या दिवशी किती कोटी कमावले?
‘ओएमजी 2’ सिनेमात अक्षय कुमार (Akshay Kumar), यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तगड्या स्टारकास्टने सजलेला हा सिनेमा सामाजिक संदेश देण्याचे काम करतो. हा सिनेमा अक्षय कुमार आणि परेश रावल अभिनित ‘ओएमजी- ओह माय गॉड’ सिनेमाचा सीक्वल आहे. तसेच, या सिनेमाला चाहते आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. तसेच, या सिनेमाला सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाचा सामना करावा लागला. तरीही सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमाला 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सुट्टीचा भरपूर फायदा झाला. सुरुवातीच्या अंदाजानुसार, या सिनेमाने रिलीजनंतर आतापर्यंतची सर्वाधिक कमाई केली आहे.
या सिनेमाने सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पाचव्या दिवशी स्वातंत्र्यदिनी जवळपास 18.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच ‘ओएमजी 2’ सिनेमाची एकूण कमाई आता 73.67 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच रिलीजच्या पाच दिवसात अक्षयच्या सिनेमाने 70 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. (akshay kumar film omg 2 box office collection day 5 how much collected on independence day know)
महत्त्वाच्या बातम्या-
सनी पाजीच्या ‘Gadar 2’ने उडवला बार! 15 ऑगस्टच्या दिवशी छापले ‘एवढे’ कोटी, कमाई 200 कोटींच्या पार
‘राधाकृष्ण’फेम अभिनेत्याने लग्नाच्या 9 वर्षानंतर पत्नीला दिला घटस्फोट; म्हणाला, ‘डिप्रेशनमध्ये…’