तर ऐका! ४५ वर्षीय शिल्पा शेट्टीसारखा फिटनेस हवाय? मग असा करा व्यायाम अन् डायट प्लॅन

actress shilpa shetty yoga exercises fitness workouts and diet secrets


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी वाढत्या वयासोबत आपल्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष दिले आहे. शिल्पाचे टोन्ड फिगर, निर्दोष त्वचा, पातळ कंबर, चमकदार केस आणि तंदुरुस्त शरीर या प्रत्येकासाठी आश्चर्यकारक बाबी आहेत.

८ जून १९७५ रोजी मँगलोर, कर्नाटक येथे जन्म झालेल्या शिल्पाचे आताचे वय हे ४५ वर्ष आहे. वयाच्या २३व्या वर्षी १९९३ साली तीने बाजीगर सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. २८ वर्षांचा सिनेसृष्टीतील अनुभव असलेली ही अभिनेत्री एखाद्या २८ वर्षीय अभिनेत्रीपेक्षाही फिट वाटते. म्हणूनच आजच्या या लेखात आपण शिल्पा शेट्टीचा डायट प्लॅन आणि व्यायाम जाणून घेणार आहोत.

शिल्पा शेट्टीचा डायट प्लॅन-
सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीला संतुलित आहार घेणे पसंत आहे. ती तिच्या दिवसाची सुरुवात आवळ्याच्या रसाने करते. विषेशतः तिच्या आहारात ब्राऊन राईस, ब्राउन पास्ता, ब्राउन शुगर आणि ब्राऊन ब्रेडचा समावेश असतो. अभिनेत्री तिचे जेवण ऑलिव्ह ऑईलमध्ये बनवते. व्यायाम झाल्यानंतर, शिल्पा प्रोटिन शेकसह, काळे मनुके आणि दोन खजूर खाते. तसेच, तिला शीतपेय पिणे अजिबात आवडत नाही, त्याऐवजी शिल्पा ग्रीन टी आणि नारळाचे पाणी पिणे पसंत करते.

शिल्पा रात्री ८ वाजेपर्यंत रात्रीचे जेवण करून घेते, जेणेकरून झोपेच्या वेळेपर्यंत जेवण व्यवस्थित पचू शकेल. न्याहारीसाठी ती ओट्सचे पीठ आणि ब्राउन शुगरसह चहा घेते. दुपारच्या जेवणामध्ये अभिनेत्रीला फायबरने भरलेले मसूर, चिकन करी आणि भाज्यासोबत ब्राऊन राईस किंवा चपाती घेणे आवडते. याशिवाय जेव्हा शिल्पाला संध्याकाळी भूक लागते, तेव्हा ती ब्राऊन ब्रेड टोस्ट, एक अंडे आणि ग्रीन टी घेते. रात्रीच्या जेवणासोबत तिला कोशिंबीर आणि सूप घेणे आवडते.

शिल्पा शेट्टीचे व्यायाम वेळापत्रक-
शिल्पा शेट्टी आपले सौंदर्य आणि तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी व्यायामाशी कधीही तडजोड करत नाही. शिल्पा आठवड्यातून किमान दोन दिवस योग, प्राणायाम आणि ध्यान करते. ती दोन दिवसांच्या वजनाच्या प्रशिक्षणासह जड व्यायाम करते, ज्यामुळे तिचे शरीर केवळ लवचिकच होत नाही तर, तिच्या स्नायूंना योग्य आकार देखील मिळतो.


Leave A Reply

Your email address will not be published.