बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे लाखो चाहते आहे. तिच्या पोस्ट लगेच व्हायरल होत असतात. श्रद्धाने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप मोठा चाहता वर्ग कमावला आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. श्रद्धा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, आता बऱ्याच काळानंतर श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. तिच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीने प्रवेश केला आहे. श्रद्धा कपूर बऱ्याच दिवसांपासून चित्रपट लेखक राहुल मोदीला डेट करत आहे. राहुल हा इंडस्ट्रीतील लोकप्रिय लेखकांपैकी एक आहे. त्यांने श्रद्धा कपूरच्या शेवटच्या रिलीज झालेल्या ‘तू झुठी, मैं मक्कर’ या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहिली होती. या चित्रपटाशिवाय राहुलने ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यांसारख्या अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट्सही लिहिल्या होत्या.
श्रद्धा कपूरच्या आयुष्यात नवे प्रेम आल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, “जर ती एखाद्याला डेट करत असेल, तर तुम्हाला काय अडचण आहे. तो देखणा आणि खूप गोड व्यक्ती आहे, त्याला डेट करू द्या.” आणखी एका यूजरने लिहिले की, “हे दोघे बॉलिवूडचे क्यूट कपल बनतील”. आणखी एका यूजरने लिहिले की, “जर हे खरे असेल, तर श्रद्धा कपूर त्याच्याशीच लग्न करेल”.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. ‘आशिकी 2’ मधील ‘आरोही’ आणि ‘राहुल’ला बऱ्याच दिवसांनी एकत्र पाहून चाहत्यांचे चेहरे उजळले आहेत. (Actress Shraddha Kapoor is dating film writer Rahul Modi)
आधिक वाचा-
–अक्षया देवधरने रोमँटिक फोटो शेअर करत पतीसाठी लिहिली खास पोस्ट, एक नजर टाकाच
–‘चालतंय की’, म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘राणादा’चा जीवनप्रवास; एकदा वाचाच