अक्षय कुमार हा एक बॉलीवूड लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या त्याच्या उत्तम चित्रपटामुळे चर्चेत असतो. तर त्याचा आगामी चित्रपट म्हणजे भूत बंगला. अक्षय कुमारने आतापर्यंत आणि उत्तम चित्रपट केले आहे. तसेच भूत बंगला चे दिग्दर्शक प्रियदर्शन आहेत. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन या जोडीने या आधीही उत्तम चित्रकार दिले आहेत. तर बऱ्याच वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र येऊन काम केली आहे. आडवांस बुकिंग आता सुरू झाले असून हा चित्रपट 17 एप्रिल 2026 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. मात्र 16 एप्रिल 2026 पासून प्रिव्हीवसाठी प्रदर्शित होतोय.
अक्षय (akshay)कुमार अभिनीत भूत बंगला या चित्रपटाच्या अधिकृत प्रदर्शनापूर्वीच, सोशल मीडियावर एक समीक्षा व्हायरल होत आहे, ज्यामुळे चित्रपटप्रेमींची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटाबद्दलच्या सुरुवातीच्या ऑनलाइन प्रतिक्रिया प्रचंड सकारात्मक आहेत. एका व्यक्तीने चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार देले आहे आणि त्याला फक्त मनोरंजन म्हटले आहे. सुरुवातीच्या समीक्षणांनुसार, ‘भूत बंगला’ ही एक दमदार हॉरर-कॉमेडी आहे, जी हास्य आणि भीतीदायक क्षणांमध्ये उत्तम संतुलन साधते. चित्रपटाचा पूर्वार्ध मनोरंजक आहे, तर उत्तरार्ध प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. क्लायमॅक्ससुद्धा खूप धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी विशेषतः अक्षय कुमारच्या अभिनयाचे कौतुक केले आहे, परंतु चित्रपटाची खरी ताकद त्याच्या सहाय्यक कलाकारांना दिली जात आहे. एका व्यक्तीने ‘एक्स’वर चित्रपटाबद्दल लिहिले, “भूत बंगला 4 स्टार्स, भरपूर ट्विस्ट, हास्य आणि दमदार हॉरर कॉमेडी. तर परेश रावल आणि राजपाल यादव यांनी चित्रपटाची मजा वाढवली आहे. तर या चित्रपटात उत्तम स्टार कास्ट आहे. तर हा चित्रपट रीलीज नंतर प्रेक्षकांच्या पंसतीस पुर्णपणे उतरतो का हे पाहणे गरजेचे राहिल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
आता कुठे आहे ‘चंद्रकांता’मधील नागराणी रूपमती? निगेटिव्ह भूमिका करुनही जिंकली प्रेक्षकांची मने


