छोट्या पडद्यावरील मराठी रिऍलिटी शो ‘बस बाई बस’ला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. या शोमध्ये मनोरंजन ते राजकारणपर्यंतच्या विविध महिला सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. नुकतंच ‘बस बाई बस’चा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री-कॉमेडियन श्रेया बुगडे हिने हजेरी लावली. ‘बस बाई बस’च्या मंचावर श्रेयाला बघून प्रेक्षक उत्सुक झाले. यादरम्यान तिने मोठा खुलासा केला.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये श्रेया बुगडे (Shreya Bugde) हिने आपल्या खासगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केला. ‘बस बाई बस’ (Bas Bai Bas) या शोच्या मंचावर श्रेयाला एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला होता. अभिनेत्रींच्या उत्तराने सर्वच थक्क झाले. यावेळी श्रेयाला विचारण्यात आलं होतं की, तिच्याजवळ चप्पलांच्या किती जोड आहेत. यावर उत्तर देत श्रेयाने सांगितले की, “माझ्याकडे 200 चप्पलांच्या जोड आहेत.”
View this post on Instagram
नक्की वाचा- ‘या’ सिनेमाला मिळाले होते ऑस्कर पुरस्काराचे नामांकन, ठरलेला दुसरा मराठी सिनेमा
अभिनेत्री श्रेयाच्या या उत्तराने सुबोधसह सर्वच चकित झाले आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शोच्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. श्रेयाच्या कॉमेडीचे आणि तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. यशोमुळे श्रेयाला अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ गुरूंच्या सांगण्यावरून ऐश्वर्या बनली बच्चन कुटुंबाची सून! पाहा बॉलिवूड कलाकारांचे अध्यात्मिक गुरू
जान्हवी पुन्हा पोहोचली ट्रोलर्सच्या पत्त्यावर! अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं