Friday, April 19, 2024

‘या’ सिनेमाला मिळाले होते ऑस्कर पुरस्काराचे नामांकन, ठरलेला दुसरा मराठी सिनेमा

हरिश्चंद्राची फॅक्टरी‘ हा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे. परेश मोकाशी यांनी सिनेमावर घेतलेली मेहनत ही त्या प्रत्येक फ्रेममधून दिसते. पहिला मुकपट करण्यासाठी दादासाहेबांना किती अडथळे पार करावे लागले, यावर हा सिनेमा भाष्य करतो. या सिनेमाला ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (Harishchandrachi Factory) सिनेमात दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या भूमिकेत नंदू माधव (Nandu Madhav) यांच्याशिवाय दुसऱ्या कोणलाही पाहणं कदाचित अशक्यच. विशेष म्हणजे, रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्याप्रमाणे परेश मोकाशी (Paresh Mokashi) यांचाही हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. त्यांनी आपल्या पहिल्या सिनेमातून आपलं नाणं खणखणीत वाजवलं होतं. ‘श्वास’ सिनेमानंतर ऑस्करमध्ये अधिकृत नामांकन मिळालेला हा मराठीतला दुसरा सिनेमा ठरला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आता ‘ते’ पण दाखवू काय?, विमानतळावर पोहोचलेल्या उर्फीचा ट्रोलर्सला जबरदस्त टोला
अबब! प्रदर्शित होण्याआधीच शाहरुखच्या चित्रपटाने केली बजेटपेक्षा जास्त कमाई

हे देखील वाचा