‘तू मला परवानगी दिली म्हणून…’, सुंदर कॅप्शनसह स्मिता तांबेने केला तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर


यावर्षी चित्रपटसृष्टीतून अनेक आनंदाच्या बातम्या आल्या आहेत, त्यातील एक म्हणजे मराठी अभिनेत्री स्मिता तांबे हिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिने ४ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. अशातच तिने तिच्या मुलीसोबतचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याआधी देखील तिने तिच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, परंतु त्या फोटोत तिचा चेहरा नीट दिसत नव्हता.

स्मिताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या मुलीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, स्मिताची मुलगी झोपलेली आहे, तर स्मिता तिच्याकडे हसून प्रेमाने बघत आहे. या फोटोमध्ये स्मिता नटून बसली आहे. तिने नाकात नथ घातली आहे. ( Actress smita tambe share her daughter photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तू मला परवानगी दिली म्हणून मी शूटिंगचा विचार करू शकते. तू माझ्यासाठी खूप खास आहे.” तिच्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. मंजिरी फडणवीस हिने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच सावनी रवींद्र हिने देखील कमेंट केली आहे. याच बरोबर तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करून तिच्या लेकीचे कौतुक करत आहेत. या फोटोमध्ये त्या दोघीही खूप सुंदर दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी याने देखील स्मिता आणि तिच्या मुलीचा एक फोटो शेअर करून तिच्यासाठी एक सुंदर कविता लिहिली होती.

स्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने ‘७२ मैल एक प्रवास’, ‘जोगवा’, ‘बायोस्कोप’, ‘गणवेश’, ‘ट्रकभर स्वप्न’, सिंघम रिटर्न्स’, ‘रुख’, ‘देऊळ’, ‘परतू’ यांसारख्या अनेक हिट सिनेमा दिले आहेत. या व्यतिरिक्त स्मिताने ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत डॅशिंग मम्मीची भूमिका साकारुन सगळ्या चाहत्यांची मनं जिंकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुटले महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे हृदय! ‘महाराष्ट्राची क्रश’ ऋता दुर्गुळे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

-अभिनेत्री ऋतुजा बागवेची सुंदरता अशी की, पाहून चाहताही म्हणाला, ‘दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन’

-Video: फॉर्म्युला फोर कार रेसर अभिनेत्री ‘मनिषा केळकर’ने अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन


Latest Post

error: Content is protected !!