Friday, March 29, 2024

तुटले महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे हृदय! ‘महाराष्ट्राची क्रश’ ऋता दुर्गुळे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्या तरुण वर्गाला भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे सर्वांची लाडकी ऋता दुर्गुळे. तिच्या निरागस डोळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर अशी काही जादू केली आहे की, तिला पाहता क्षणीच अनेकजण तिच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळेच तिला महाराष्ट्राची क्रश असे नाव पडले. ऋता नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने सोशल मीडियावर एक गोड बातमी सांगितली आहे. तिच्यासाठी जरी बातमी गोड असली, तरी तमाम महाराष्ट्रातील तरुण मुलांचे हृदय तोडणारी आहे. ती बातमी म्हणजे ऋता रिलेशनमध्ये आहे आणि तिने या नात्याची अधिकृत माहिती दिली आहे.

हो! अगदी बरोबर ऐकलंत, लाखो मुलांना तिच्या प्रेमात पाडणारी ऋता स्वतः प्रेमात पडली आहे. ती गुजराती टेलिव्हिजन आणि चित्रपट दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत मागील काही दिवसापासून रिलेशनमध्ये आहे. याची माहिती तिने नुकतेच सोशल मीडियावर अधिकृत केली आहे. तिने प्रतीकसोबत एक सुंदर फोटो शेअर करून ही बातमी दिली आहे. (Hruta durgule open up her relation with director pratik Shah on social media)

ऋताने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून प्रतीक शाहसोबत एक गोड फोटो शेअर केला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की, प्रतीक आरशात फोटो काढत आहे, तर ऋता त्याच्याकडे बघून गोड स्माईल देत आहे. या फोटोमध्ये ऋताने पिवळ्या रंगाच्या तर प्रतीकने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मला तुझ्यात अशी आशा सापडली आहे, जी मला कधीच माहीत नव्हती.” तसेच तिने हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिच्या या फोटोवर ऋतुजा देशमुख, खुशबू तावडे, सायली संजीव, तेजस बर्वे, रसिका सुनील, अन्विता फलटणकर, गौरी नलावडे यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ऋताने देखील प्रत्येकाला थॅंक यू असा रिप्लाय दिला आहे. एकीकडे कलाकरांसाठी ही आनंदाची गोष्ट असली, तरी दुसरीकडे चाहत्या वर्गामध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.

तिचे चाहते या पोस्टवर कमेंट करून त्यांचे दुःख व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “आता हृदय तुटलं आहे, तर जगून तरी काय फायदा.” तसेच आणखी एकाने लिहिले आहे की, “प्रेमभंग.” एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “सपना तुटा है तो दिल कभी जलता है, हा थोडा दर्द हुआ पर चलता है.” आणखी एक चाहता म्हणतो, “छन से तुटा कोई सपना” अशा अनेक प्रकारे तिचे चाहते त्यांचे दुःख जाहीर करत आहे.

ऋता ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखांमध्ये फॉलोवर्स आहेत. तिने या आधी ‘फुलपाखरू’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले आहे. ती सध्या झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत काम करत आहे. मालिकेतील तिचे दिपू नावाचे पात्र देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा