इंडस्ट्रीत येताच झाली ऐश्वर्याशी तुलना, तब्बल ४ वर्षे ‘या’ गंभीर आजाराशी झगडत होती सलमानची अभिनेत्री


सुपरस्टार सलमान खानने आजपर्यंत अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. अशीच एक अभिनेत्री आहे, तिला जेव्हा सलमानने आपल्या चित्रपटातून लाँच केले, तेव्हा तिची तुलना थेट सौंदर्याची खाण असलेल्या ऐश्वर्या राय बच्चनसोबत केली जाऊ लागली. तो चित्रपट होता २००५ साली प्रदर्शित झालेला ‘लकी: नो टाईम फॉर लव्ह’ आणि ती अभिनेत्री म्हणजे स्नेहा उल्लाल होय. स्नेहाला आपल्या पहिल्याच चित्रपटातून तुफान प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये असे म्हटले गेले की, सलमानने ऐश्वर्याला टक्कर देण्यासाठीच स्नेहाला चित्रपटसृष्टीत आणले आहे. मात्र, असे असले तरीही स्नेहा मोठ्या पडद्यावर काही कमाल दाखवू शकली नाही. स्नेहा शनिवारी (१८ डिसेंबर) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील काही खास गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया…

जन्म
बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत (Aishwarya Rai Bachchan) तुलना केल्या जाणाऱ्या अभिनेत्री स्नेहा उल्लालचा (Sneha Ullal) जन्म १८ डिसेंबर, १९८७ रोजी मशकट, ओमान येथे झाला आहे. स्नेहाने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात करत सलमान खानसोबत (Salman Khan) बॉलिवूड पदार्पण केले होते.

सलमानसोबतच्या ‘लकी: नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटानंतर स्नेहाने सोहेल खानसोबत ‘आर्यन’, ‘जाने भी दो यारो’ आणि ‘क्लिक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण या सर्व चित्रपटांमधून स्नेहाला फारसे यश मिळाले नाही आणि २०१५ मध्ये  ती अचानकच बॉलिवूडमधून गायब झाली.

चार वर्षे स्वत:च्या पायांवर उभी होऊ शकली नव्हती अभिनेत्री
सन २०१५ नंतर स्नेहाने एका दीर्घ काळानंतर पुनरागमन केले. जेव्हा तिला चित्रपटांपासून दूर राहण्याचे कारण विचारण्यात आले, तेव्हा स्नेहाने आपल्या आजाराबाबत खुलासा केला. स्नेहाने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, ऑक्टोइम्यून डिसऑर्डर आजाराने ग्रस्त होती. तसेच ती चार वर्षे स्वत:च्या पायावर उभी होऊ शकली नव्हती. हा रक्ताशी संबंधित आजार असतो. मात्र, आता ती एकदम ठणठणीत आहे.

सलमानकडून काम मागण्यास दिला होता नकार
दीर्घकाळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या स्नेहाने माध्यमांशी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली होती. ती म्हणजे ती सलमानकडे काम मागण्यासाठी जाणार नाही. स्नेहाने सलमानबाबत बोलताना म्हटले होते की, “सलमानसोबत तिचे चांगले नाते आहे. तो खूप चांगला व्यक्ती आहे. सर्वांनी सांगितले की, मी त्याच्याशी कामाबाबत विचारू. मात्र, मी असे करण्यास नकार दिला.”

बॉलिवूडमध्ये अभिनयाची जादू दाखवण्यास अपयशी ठरलेल्या स्नेहाने पुढे २००८ साली ‘उल्लासमगा उत्सहमगा’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिचा हा सिनेमा हिट ठरला. त्यानंतर तिचा त्याच वर्षी ‘नेनू मीकू तेलुसा…?’ हा दुसरा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. पुढे ती तेलुगू चित्रपट ‘किंग’मधील ‘नुव्वू रेडी’ या गाण्यात सुपरस्टार नागार्जुन यांच्यासोबत दिसली.

त्यानंतर स्नेहाने २००९ मध्ये तिला अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत रस आहे, हे दाखवण्यासाठी तिने ‘काश… मेरे होते’ या हा चित्रपट साईन केला. तिचे पुढील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले आपटले. मात्र, तिकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत २०१० साली आलेला तिचा बालकृष्णा विरुद्धचा सिम्हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.

स्नेहाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची २०२१ मध्ये आलेल्या ‘लॉ ऑफ ऍट्रॅक्शन’ या मालिकेत दिसली होती. आता ती ‘साको-३६३, अमृता की खेजडी’ या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाव्यतिरिक्त स्नेहा सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असते. ती नेहमीच आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!