चित्रपटाच्या सेटवर भेट, व्हेनिसमध्ये रोमान्स अन् मालदीवमध्ये प्रपोज, सुंदर आहे रिचा आणि अलीची लव्हस्टोरी


एखाद्यावर प्रेम करणे आणि त्याला आपल्या जीवनात समाविष्ट करणे, ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात मोठी भेट असते. प्रत्येकाच्या नशिबात प्रेम नसतं किंवा देव प्रत्येक व्यक्तीला हा आशीर्वाद देत नाही. मात्र, जो कोणी प्रेमात पडतो, त्याला दुसरे काही दिसत नाही. असाच काहीसा प्रकार बॉलिवूडचा हँडसम हंक अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा यांच्या बाबतीत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. ‘हम बने तुम बने एक दुजे के लिए’ असे वाटते की, हे गाणे त्यांच्यासाठी आहे. विशेष म्हणजे शनिवारी (१८ डिसेंबर) रिचा आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त अली फजल आणि रिचा चड्ढाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया…

दोघांचे सुंदर फोटो याचा पुरावा आहे की, अली आणि रिचा दोघेही एकमेकांसाठीच बनले आहेत. दोघांची प्रेमकथाही कमी रंजक नाही. मालदीवमध्ये प्रपोज, व्हेनिसमध्ये रोमान्स आणि चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट हे सर्व खूप फिल्मी आहे, पण हृदयाला स्पर्श करणारी आहे. अली आणि रिचाच्या प्रेमकथेमध्ये ते सगळं आहे, ज्याचं प्रत्येक कपल स्वप्न बघत असत.

पहिली भेट
रिचा चड्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) २०१२ मध्ये पहिल्यांदा त्यांच्या ‘फुकरे’ चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि दोघांमध्ये एकमेकांच्या प्रेमाची ठिणगी पेटू लागली.

मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत…
हा तो क्षण होता ज्याची प्रत्येक मुलगी वाट पाहत असते. रिचाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, दोघेही त्यांच्या घरी चित्रपट पाहत होते, तेव्हा तिने पहिल्यांदा अलीला ‘आय लव्ह यू’ म्हटले आणि अलीला रिचाबद्दलचे आपले प्रेम कबूल करायला तीन महिने लागले. मात्र, एकदा दोघांनी त्यांचे प्रेम स्वीकारले, ते कायमचे एकमेकांचे झाले.

सर्वांसमोर प्रेम कबूल केले
पाच वर्षांपर्यंत त्यांचे नाते गुप्त ठेवल्यानंतर शेवटी रिचा चड्ढा आणि अली फजल यांनी ते अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. व्हेनिसमध्ये ‘व्हिक्टोरिया आणि अब्दुल’च्या वर्ल्ड प्रीमियरमध्ये हे दोघे एकमेकांसोबत दिसले.

मालदीवमध्ये केले प्रपोज
अली फजलने मालदीवमध्ये रात्रीच्या जेवणाचा प्लॅन केला आणि जेवण झाल्यानंतर अलीने शॅम्पेनची बाटली उघडली, गुडघ्यावर खाली बसला आणि रिचा चड्ढाला विचारले की, “तू माझ्याशी लग्न करशील का?” हाच तो क्षण होता, जेव्हा दोघांनीही आपले संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतला.

आयुष्यातील मोठा दिवस
रिचा चढ्ढा आणि अली फजल २०२० मध्ये एप्रिल महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकणार होते. मात्र, कोरोना महामारीमुळे दोघांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले. आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रिचा आणि अलीने ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ या दोन चित्रपटात एकत्र काम केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!