‘असा’ आहे यशस्वी चित्रपट देणाऱ्या रिचा चड्ढाचा सिनेप्रवास, फिल्मफेअर पुरस्कारावरही कोरलंय आपले नाव


बॉलिवूडमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय जसं प्रवेश मिळवणं अवघड तसच एकदा प्रवेश झाल्यावर कामात सातत्य टिकवणं त्याहूनही अवघड! प्रत्येक क्षणाला कलाकाराला इथे एक वेगळ्याच कसोटीला सामोरं जावं लागतं. जे या कसोटीला सचोटीने सामोरे जातात तेच कलाकार बॉलिवूडमध्ये यश मिळवतात. ज्या गुणी कलाकाराविषयी आपण बोलणार आहोत तीच नाव आहे रिचा चड्ढा! रिचा शनिवारी (१८ डिसेंबर) आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिचा जीवनप्रवास. चला तर मग सुरुवात करूया…

‘फुकरे’ या चित्रपटात साध्या भोळ्या पंजाबी मुलीची भूमिका साकारणारी रिचा चड्ढा खऱ्या आयुष्यात मात्र एक पंजाबी कुडी आहे. कलाकाराला आपण जे नसतो अशा भूमिका साकारणं एखादेवेळी सोपं जाईल परंतु आपण जे असतो ती भूमिका साकारण आणि ती नवख्या पद्धतीने साकारणं हे महाकठीण काम असतं. १८ डिसेंबर, १९८६ रोजी पंजाबच्या अमृतसर येथे जन्मलेल्या रिचाचे वडील एका मॅनेजमेंट फर्मचे मालक आहेत आणि तिची आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहे.

रिचा चड्ढा हिने तिचं सुरुवातीचं शिक्षण दिल्ली येथे घेतलं. कलांतराने मॉडेल म्हणून तिने पदार्पण केलं परंतु त्यानंतर तिने नाटकात काम करायला सुरुवात केली. रिचा पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘ओए लकी लकी ओय’ या चित्रपटामार्फत दिसली होती. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती. २००८ मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर ती २०१० मध्ये आलेल्या बेनी आणि बबलू या चित्रपटात पुन्हा एकदा छोट्या भूमिकेत दिसली होती.

गँग्स ऑफ वासेपुरपूर (भाग -१) चित्रपटात रिचा पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसली होती. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट प्रचंड गाजला आणि चित्रपटात नगमा खातूनची भूमिका साकारल्याबद्दल रिचाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर समीक्षकांचा पुरस्कार मिळाला. पुढे याच चित्रपटाच्या दुसर्‍या भागात देखील रिचा दिसली. कालांतराने ‘फुकरे’ आणि मग ‘मसान’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत झळकली. तिचे हे सर्व सिनेमे सलग यशस्वी ठरले आणि आणि रिचा चड्ढा बॉलिवूडमध्ये नावारूपास आली.

यानंतर तिने एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. त्यामध्ये ‘सरबजीत’, ‘फुकरे रिटर्न्स’, ‘सेक्शन ३७५’, ‘पंगा’, ‘घूमकेतू’, ‘शकीला’, ‘मॅडम चिफ मिनिस्टर’, ‘लाहोर कॉन्फिडेन्शल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!