ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये आपण असे अनेक कलाकार बघतो ज्यांनी स्वतःचे खरे नाव लपवत किंवा बाजूला ठेवत नवीन नावाने स्वतःची मोठी ओळख निर्माण केली आहे. नाव बदलण्याचा जणू एक ट्रेंडच बॉलिवूडमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. काही कलाकार नाव बदलूनच या क्षेत्रात पदार्पण करतात, काही जणं कोणाच्या सांगण्यावरून नावात बदल करतात तर काही ज्योतिष्यावर विश्वास ठेऊन नावात बदल करतात. बॉलिवूडमधला हा ट्रेंड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील पाहायला मिळतो. टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी त्यांचे खरे नाव न वापरता नवीन नावाने या क्षेत्रात ओळख बनवली आहे. या लेखातून जाणून घेऊया अशाच काही अभिनेत्री आणि त्यांची खरी नावे.
रश्मी देसाई :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा म्हणून रश्मी देसाईकडे पाहिले जाते. अनेक मालिकांमधून तिने आपले मनोरंजन केले आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? रश्मीचे खरे नाव शिवानी देसाई होते. पुढे रश्मीने तिचे नाव दिव्या केले आणि नंतर पुन्हा रश्मी केले. आता हे नाव एक ब्रँड बनले आहे.
अनीता हसनंदानी :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय चेहरा म्हणजे अनीता हसनंदानी. अनिताने अनेक मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी अनिताचे नाव नताशा होते, मात्र तिने ते बदलून अनिता ठेवले.
टिया बाजपेयी :
‘घर की लक्ष्मी बेटियां’ या हिट मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी टिया मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये देखील झळकली आहे. तिने हिट विक्रम भट्ट यांच्या सिनेमात देखील काम केले आहे. टियाचे खरे नाव ट्विंकल असून, विक्रम भट्ट यांनी तिचे नाव बदलून टिया केले.
निया शर्मा :
टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड, लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून निया शर्मा ओळखली जाते. बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. नियाचे खरे नाव नेहा शर्मा असून, या क्षेत्रात येण्यापूर्वी तिने तिचे नाव बदलून निया केले.
रिद्धिमा तिवारी :
टेलिव्हिजनसोबत चित्रपटांमध्ये काम करणारी रिद्धिमा तिवारी लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने विद्या बालनसोबत ‘बेगम जान’ सिनेमात काम केले असून तिचे खरे नाव श्वेता तिवारी आहे.
हेही वाचा :
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार