Friday, December 1, 2023

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला अपघात, कारला ट्रकने दिली जबरदस्त धडक

‘इश्क का रंग सफ़ेद’फेम अभिनेत्री स्नेहल राय विषयी एक वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेत्री स्नेहल हिचा अपघात झाला आहे. ती पुण्याला जात होती. जात असताना त्यांच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे त्यांच्या कारचे पूर्ण नुकसान झाले आहेत. यावेळी चालकाने हुशारीने सर्वांना वाचवले आहे.

चालकाने आपला संयम अजिबात सोडला नाही. अभिनेत्री स्नेहलला (Snehal Rai) वाचवता येईल त्या दिशेने तो गाडी चालवत राहिला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. चालक आणि स्नेहलला गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे त्याला मलमपट्टी करण्यात आली.

अभिनेत्री स्नेहलने त्या ट्रकच्या मालकाकडे भरपाई मागितली तेव्हा त्याने नकार दिला. इतकेच नाही तर ट्रकचा मालक धमकी देऊन तेथून गायब झाला आहे. यानंतर अभिनेत्री स्नेहलने जवळच्या पोलीस ठाण्यात फोन केला पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात शनिवारी (10 जून) झाला आहे.

माध्यमांशी बोलताना स्नेहल म्हणाली की, ‘माझ्यासोबत काय झाले हे मला अजूनही समजले नाही. अचानक कोठून तरी एक ट्रक आला आणि त्यांने माझ्या कारला धडक दिली. पण माझा जीव वाचला. तो फक्त माझ्या गाडीच्या चालकामुळेच. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. आम्ही पोलिस स्टेशनला फोन केला. त्यानंतर 5-10 मिनिटांत पोलिस तिथे आले. बोरघाट पोलीस स्टेशनचे योगेश भोसले सर यांचे देखील मी आभारी मानते. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. मी घाबरत होतो की काय होईल, पण त्यांनी आम्हाला मदत केली. त्यावेळी त्यांनी त्यांनी मला ग्लुकोज दिले. (Actress Snehal Rai’s car accident while going to Pune)

अधिक वाचा-
आहा कडकच ना! गुलाबी रंगाची साडी नेसून कियारा अडवाणीने केले चाहत्यांना घायाळ
अभिनेता ते राजकीय नेता ‘असा’ आहे नंदामुरी बालकृष्ण यांचा जीवनप्रवास; एकदा वाचाच

हे देखील वाचा