Sunday, April 14, 2024

भोजपूरी इंडस्ट्रीवर राज्य करतात ‘या’ पाच अभिनेत्री; सौंदर्यापासून ते संपत्तीच्या बाबतीत आहेत सर्वांत प्रथम

कलाकार पडद्यावर दिसतात तितकेच खऱ्या आयुष्यात श्रीमंत असतात का? हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का. तर या प्रश्नाच उत्तर हो आहे. पण सगळ्याच कलाकारांची नावे या यादीत नाही. खूप कमी नावे या यादीत घेतली जातात. बाॅलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत. ज्यांच्या संपत्तीविषयी ऐकून आपल्याला त्यावर विश्वास बसत नाही. अशाच भोजपूरी इंडस्ट्रीतील देखील काही अभिनेत्री आहेत. चलातर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी.

मोनालिसा
भोजपूरी (Bhojpuri) इंडस्ट्री ते टेलिव्हिजन इंडस्ट्री असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा होय. आज मोनालिसाच्या कोणत्याही खास परिचयाची ओळख नाही. तिने तिच्या डान्सने, अभिनयाने आणि बोल्ड लुक्सने चाहत्यांची मने जिंकून घेतली आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत फँनच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मोनोलिसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. बिग बॉसमध्ये आल्यानंतर त्याच्या करिअर नवी दिशा मिळाली. माध्यमातील वृत्तानुसार, मोनालिसाची संपत्ती 18 कोटी रुपये आहे.

अक्षरा सिंह
अक्षरा सिंह अभिनय आणि गाण्यासाठीही प्रचंड लोकप्रिय आहे. अक्षराची गाणी चाहत्यांना खूप आवडतात. उत्तम अभिनय आणि चांगले गाण्यासोबतच ती फॅशनमध्येही भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते.ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 13 वर्षांपूर्वी भोजपुरी इंडस्ट्रीत दाखल झालेल्या अक्षरा सिंगची एकूण संपत्ती सुमारे 18 कोटी आहे.

आम्रपाली दुबे
अभिनेत्री आम्रपाली दुबेचे ( Amrapali Dubey)नाव भोजपुरी इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. तिने भोजपुरीमध्ये काम करण्यापुर्वी तिने हिंदी टेलिव्हिजवरील प्रदर्शित होणाऱ्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियीवर नेहमी सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. ती नेहमी आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. आम्रपाली अभिनेत्रीसोबतच एक चांगली गायिका देखिल आहे. तिची अभिनेता निरहुआसोबतची जोडी खूप प्रसिद्ध झाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार तिची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.

राणी चटर्जी
भोजपुरी मनोरंजन विश्वात ‘राणी चटर्जीचा’ (Rani Chatterjee) खूप दबदबा पाहायला मिळतो. रानी तिच्या दमदार व्यक्तीमत्वासाठी प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्धी आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना अक्षरशः वेड लावत आहे. राणी तिच्या मनमोहक अदा़ंनी प्रेक्षकांना भुरळ घालते. राणीने भोजपुरी चित्रपटांतून खूप नाव कमावण्यासोबतच पैसाही कमावला आहे. तिने मेहनतीच्या जोरावर 7 कोटींची कमाई केली आहे.

नम्रता मल्ला
भाेजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता मल्लाने तिच्या सौदर्यांयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. नम्रता मल्लाच्या दमदार अदा आणि बिकिनी लूक्स कायमच साेशल मीडीयावर चर्चेत विषय असतो. नम्रताच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर प्रत्येक फाेटाेमध्ये ती बिकिनी घालून दमदार पाेज देताना दिसते. नम्रताचा बिकिनी लूक प्रत्येकवेळी प्रचंड व्हायरल हाेताे. नम्रता मल्ला (Namrita Malla) हिने सोशल मीडियाद्वारे भाेजपुरी चित्रपटांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. नम्रताचे दिवसेंदिवस इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढत आहेत. तिच्याकडे असलेल्या संपत्ती विषयी बोलायच झाल तर, माध्यमातील वृत्तानुसार, नम्रताची एकूण संपत्ती 2 कोटी रुपये आहे. (Actress Monalisa and Amrapali Dubey are the richest actresses in Bhojpuri industr)

अधिक वाचा-
दु:खद! प्रसिद्ध अभिनेते मंगल ढिल्लोन यांचे निधन, सिनेसृष्टीत शोककळा
मोठी बातमी! अभिनेत्री रुबीना दिलैकचा अपघात; अभिनेत्री गंभीररित्या जखमी

हे देखील वाचा