कपूर घराण्यात पुन्हा होणार जल्लोष, ‘ही’ अभिनेत्री आहे गरोदर

बॉलिवूडमधून या वर्षी अनेक आनंदाच्या बातम्या येत आहेत. काही कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत, तर काहिनाच्या घरात पाळणा हलला आहे. अनेक बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन अभिनेत्रींनी या वर्षी त्या आई होणार असल्याची बातमी दिली आहे. अशातच अभिनेत्री सोनम कपूर हिने देखील नुकतेच तिच्या आयुष्यातील पहिली गोड बातमी तिच्या चहत्त्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोनम आई होणार आहे. हि गोड बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सोनमने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा पती आनंद अहुजासोबत बेबी बंप फ्लॉन्ट करताना काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने काळ्या रंगाची मोनोकनी घातली आहे. तिचा पती सोफ्यावर बसलेला आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा टी- शर्ट घातला आहे. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली दिसत आहे. फोटोमध्ये ते दोघेही खूप खुश दिसत आहेत.

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “आमचे चार हात आणि दोन हृदये तुझे शक्य तितक्या चांगल्याप्रकारे पालन पोषण करण्याचा प्रयत्न करू. आमचे प्रत्येक पाऊल तुझ्याशी एकरूप होईल. तुझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करू. तुझ्या आगमनाची आम्ही जास्त वाट नाही पाहू शकत.”

तिने शेअर केलेल्या या फोटोवे तिचे चाहते तसेच कलाकार कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या या बातमीने कपूर घराण्यात नक्कीच आनंद येणार आहे. सोनम कपूरने २०१८ साली आनंद अहुजासोबत लग्न करून तिच्या सुखी संसाराला सुरुवात केली. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post