आजचा म्हणजेच १३ ऑगस्ट हा दिवस बॉलिवूड चाहत्यांसाठी खूपच खास आहे. याच दिवशी १९६३ रोजी हिंदी सिनेविश्व गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीचा जन्म झाला होता. ती अभिनेत्री इतर कुणी नसून श्रीदेवी ही आहे. श्रीदेवी यांची शनिवारी (दि. १३ ऑगस्ट) जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त त्यांच्यावर चाहत्यांसोबतच त्यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिनेदेखील आईच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने आपल्या आईसोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.
खरं तर, सन २०१८ मध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचा ‘धडक’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच श्रीदेवी (Sridevi) यांनी जगाचा निरोप घेतला होता. श्रीदेवींच्या जयंतीनिमित्त (Sridevi Birth Anniversary) कलाकारांसोबतच चाहतेही तिच्या आठवणीत रमले आहेत. अशात जान्हवीनेही तिच्या दिवंगत आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने एक भावूक मेसेजही लिहिला आहे.
जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर श्रीदेवीसोबत आपला एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रीदेवी जान्हवीला मिठीत घेताना दिसत आहेत. श्रीदेवी यांनी गुलाबी रंगाची साडी नेसली आहे, तर लहानग्या जान्हवीने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. दोघांचाही हा फोटो खूपच सुंदर दिसत आहे. हा शानदार फोटो शेअर करत जान्हवीने लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. मी दररोज तुझी आठवण काढते. मी नेहमी तुझ्यावर प्रेम करेल.”
View this post on Instagram
जान्हवीच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच कलाकारही कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. मनीष मल्होत्रा, वरुण धवन, सनी कौशल, सनी कौशल आणि झोया अख्तर यांनी हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. दुसरीकडे, एका युजरने लिहिले की, “देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “त्या नेहमीच तुझ्यासोबत आहेत आणि मला विश्वास आहे की, त्यांना तुझा अभिमान आहे.” याव्यतिरिक्त श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर हिनेदेखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत श्रीदेवी खुशीला किस करताना दिसत आहेत.

श्रीदेवी यांच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी बालकलाकार म्हणून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांनी ‘सोलवा सावन’ या सिनेमातून पदार्पण केले, ज्यामध्ये त्या जीतेंद्र यांच्यासोबत झळकल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत ‘नगीना’, ‘चांदनी’, ‘लाडला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘खुदा गवाह’, ‘मॉम’ आणि ‘इंग्लिश विंग्लिश’ यांसारख्या अनेक शानदार सिनेमात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भयंकर! 15 वेळा हॉरर चित्रपट पाहिल्यानंतर स्वतःलाच समजू लागला भूत, पेटवून घेत केली आत्महत्या
‘यामुळे’ कॅटरिना, दीपिकावर संतापला करण जोहर, असा घेणार बदला
यशस्वी झाल्यावर जेव्हा वाईट संगतीत पडली होती सारा खान; म्हणाली, ‘तुम्ही आयुष्य बरबाद करून घेता’