Saturday, June 15, 2024

‘पैसा असेल तर…’ सलमान अन् अक्षयच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर युजर्सच्या भन्नाट कमेंट

अक्षय कुमार आणि सलमान खानचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही स्टार्सचा उत्साह पाहून चाहते चकित आहेत. तर झाले असे की, दाेन्ही स्टार्स एक लग्न साेहळ्यात सामील झाले हाेते. यावेळी दाेन्ही कलाकरांनी आपल्या डान्सने रंगमंचावर धमाल केली. दोन्ही स्टार्स त्यांच्या आगामी ‘सेल्फी‘ आणि ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले हाेते.

व्हायरल व्हिडिओमध्ये सलमान खान (salman khan) त्याच्या ‘दबंग’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे, तर अक्षय कुमार (akshay kumar) ‘मैं खिलाडी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघांचाही व्हिडिओ पॅपराझींनी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खान आणि अक्षय कुमारचा हा डान्स व्हिडीओ काही चाहत्यांना खूप आवडला आहे, तर काही युजर्स या कलाकारांना ट्राेल करत आहेत. व्हायरल व्हिडिओवर दोघांची खिल्ली उडवत एकाने कमेंट करत लिहिले की, ‘पैसा असेल तर लोक माेठे माेठी कलाकारही नाचवतात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ 2023 मध्ये रिलीज होणार आहे. यानंतर तो ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे जो या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये सलमान व्यितिरिक्त कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मीही मुख्य भूमिकते आहे. याशिवाय सलमान जॅकलिन फर्नांडिससोबत ‘किक 2’मध्येही दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

तर दुसरीकडे अक्षय कुमार ‘सेल्फी’ चित्रपटामध्ये दिसणार असून हा चित्रपट 24 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यासोबतच अक्षय कुमार सध्या टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.(bollywood actor salman khan and akshay kumar dance performed on popular song main khiladi tu anari and munna badnam hua at wedding function in delhi )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर

स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा