Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बापरे! सनी लिओनीने ‘अशा’प्रकारे पूर्ण केले खतरनाक चॅलेंज, व्हिडिओला २० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

एखाद्या क्षेत्रात जाऊन, तिथे आपल्या कलेची जादू दाखवणे खूप कमी जणांना जमते. यामध्ये आवर्जुन उल्लेख करावे असे नाव म्हणजे अभिनेत्री सनी लिओनी होय. सनीने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला एक वेगळाच ठसा उमटवलाय. तिने सन २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनयाव्यतिरिक्त सनी सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. सनीचे चाहते फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर पसरला आहे. त्यामुळेच कदाचित तिने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते. अशातच सनीचा आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सनीचा हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री एक आव्हान स्वीकारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दोन प्लेट्स घेऊन खेळताना दिसत आहे आणि सनी त्या प्लेट्समधून आपले डोके वाचवताना दिसत आहे. हे आव्हान तिथे उभ्या असलेल्या सर्व लोकांनी पूर्ण केले, परंतु शेवटच्या एका व्यक्तीला ते पूर्ण करता येत नाही. त्याच्या डोक्यावर पुन्हा पुन्हा थाळी पडते आणि तो जोरजोरात रडू लागतो. (Actress Sunny Leone Video Shares A Funny Video On Instagram)

व्हिडिओमध्ये सनी लिओनी जॅकेटसह लाल रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसत आहे. सनीची ही फनी स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळेच अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सनीच्या या व्हिडिओवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. अभिनेत्रीच्या या व्हिडिओला आतापर्यंत २६ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सनी लिओनी बॉलिवूडमध्ये तिच्या आयटम नंबर गाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणूनही काम केले आहे. ‘लीला’ चित्रपटातील सनी लिओनीच्या व्यक्तिरेखेचे ​​आणि अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक

-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे

-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’

हे देखील वाचा