Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड Fraud | सनी लिओनीची मोठी फसवणूक, पॅन कार्डचा झाला चुकीचा गैरवापर

Fraud | सनी लिओनीची मोठी फसवणूक, पॅन कार्डचा झाला चुकीचा गैरवापर

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सध्या फसवणूक आणि त्यांच्या बँक खात्यातील झालेल्या अफरातफरीची तक्रार दाखल करताना दिसत आहेत. आता या यादीत अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) नाव सामील झाले आहे. सनीने ही तिच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर करत पैसे काढल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

अभिनेत्री सनी लिओनीच्या पॅन कार्डचा गैरवापर करत पैसे काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबद्दलची माहिती स्वतः अभिनेत्री सनी लिओनीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. यासंदर्भात तिने एका अ‍ॅप विरोधात गंभीर आरोप केले आहेत. याबद्दल सनीने सांगितले की, तिच्या पॅन कार्डचा वापर करत कोणीतरी धनी अ‍ॅपचा वापर करत २००० रुपयांचे कर्ज घेतले आहे. तेव्हापासुन तिचा सिबील स्कोरसुद्धा खाली आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. याबद्दल संबधित कंपनीसुद्धा आपल्याला सहकार्य करत नसल्याची माहिती सनीने दिली होती. मात्र सनीच्या या ट्विटनंतर इंडिया बुल्स सेक्युरीटी कंपनीने सनीसोबत संपर्क साधत तिच्या अडचणी दूर केल्या त्यानंतर सनीने देखील तात्काळ हे ट्वीट डिलीट केले आहे.

आपली अडचण दूर झाल्यानंतर सनीने या कंपनीचे आभार मानले आहेत. ज्यामध्ये ती म्हणते की, “धन्यवाद IVL सेक्युरीटी, IB होमलोन माझी अडचण दूर केल्याबद्दल आणि पुन्हा असे होणार नाही याची हमी दिल्याबद्दल. मला माहितेय तुम्ही आम्हा सर्वांची खूप काळजी घेता आणि यापुढेही घ्याल अशा प्रकारच्या समस्या कुणालाही येऊ नयेत.”

तत्पूर्वी सनीने आपली अडचण सांगताना एक ट्वीट केले होते. ज्यामध्ये तिने तक्रार दाखल केली होती की, “कुणीतरी बावळटाने माझ्या पॅन कार्डचा गैरवापर केला आहे. आणि २००० रुपयांचे कर्ज घेतले आहे. ती संबधित कंपनीसुद्धा यामध्ये माझी मदत करायला तयार होत नाही.”  याआधीही अनेक कलाकार अशा प्रकारच्या गैरव्यवहाराचे शिकार झाले आहेत.

हेही वाचा –

हे देखील वाचा