×

बॉलिवूडमध्ये पुन्हा उडणार लग्नाचा बार! ना निकाह, ना सातफेरे; हटके पद्धतीने होणार फरहान-शिबानीचं लग्न

बॉलिवूडमध्ये सध्या दररोज एका लग्नाचा बार उडताना दिसत आहे. मौनी रॉय, कॅटरिना कैफ अशा अनेक कलाकारांनी लग्न केले आहे. आता हिंदी चित्रपट जगतात आणखी एक जोडी विवाह बंधनात अडकणार असल्याचे निश्चित झाले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चर्चांना पूर्णविराम देत दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. दोघेही आता कायमचे एकमेकांचा हात पकडण्याच्या तयारीत आहेत. समोर आलेल्या बातमीनुसार, दोघेही 19 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. अत्यंत वेगळ्या पद्धतीने दोघेही लग्न करणार आहेत.

हेही पाहा- अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली, जॅकी श्रॉफकडून खाल्ली १७ वेळा कानाखाली । Jackie Slapped Anil Kapoor

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नातील हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. दोघेही ही गोष्ट गुप्त राहावी म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, शेवटी बातम्या समोर आल्याच. आता या लग्नाची विशेष गोष्ट म्हणजे दोघांनी हे लग्न निकाह करत किंवा सात फेरे घेऊन न करता तिसराच मार्ग निवडला आहे. हे जोडपं मराठी रीतीरिवाजाप्रमाणेसुद्धा लग्न करणार नाहीत. दोघांनी आपला विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नात कोणताच थाट न करता अत्यंत साधेपणाने हा सोहळा करण्याचा दोघांचा विचार आहे. त्यामुळे त्यांनी लग्नात येणार्‍या पाहुण्यांनासुद्धा अत्यंत साधी कपडे घालून येण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये त्यांनी साधी पांढरी कपडे घालून येण्याचे सुचवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

शिबानी ही हिंदू आणि फरहान मुस्लिम असल्याने दोघांनी एकमेकांच्या धर्मात न पडता किंवा दोघांना कुणाचा धर्म आचरण करावा लागू नये म्हणून त्यांनी स्वतःच त्यांची मन्नत तयार केली आहे. ज्याला ते आपल्या लग्नादिवशी म्हणजे 19 फेब्रुवारीला वाचणार आहेत. आता या विवाह सोहळ्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा-

Latest Post