×

हृदयद्रावक! अनेक दिवस बंगल्यातच पडून होता अभिनेत्रीचा मृतदेह; अंत्यसंस्कारही झाले नाही नीट

बॉलिवूड म्हटले की, डोळ्यासमोर उभे राहते ते ऐश्वर्य, प्रसिद्धी आणि पैशाने भरलेली एका झगमगाटी दुनियेचे चित्र. हिंदी चित्रपटातील अभिनेत्री त्यांच्या ग्लॅमरस आयुष्यामुळे चर्चेत असतात. मात्र, काही अभिनेत्रींनी प्रचंड यशस्वी होऊनही त्यांच्या शेवटच्या काळात भयानक दुःख आणि वेदना सहन करत करत जगाचा निरोप घेतला. यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे नलिनी जयवंत. काय होती या अभिनेत्रीची कहाणी चला जाणून घेऊया…

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नलिनी जयवंत (Nalini Jaywant) यांची शुक्रवारी (18 फेब्रुवारी) जयंती. नलिनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांची तुलना त्याकाळातील आघाडीची अभिनेत्री मधुबालासोबत होत होती. आपल्या कारकिर्दीत नलिनीने यांनी अनेक दर्जेदार चित्रपटात काम केले. नलिनी यांचा जन्म 18 फेब्रुवारी, 1926 रोजी मुंबईमध्ये झाला होता. नलिनी यांनी हिंदी चित्रपट जगतात वयाच्या 14 व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम केले होते.

हिंदी चित्रपट क्षेत्रात नलिनीने 1941 साली ‘बहन’ चित्रपटातून दमदार सुरुवात केला. त्या काळात देव आनंदपासून दिलीप कुमार यांच्यापर्यंत अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केले. प्रत्येकजण त्यांच्या सौंदर्याच्या प्रेमात होते. मात्र, नलिनी यांच्या आयुष्यात दुःखही तितकेच होते. जे त्यांना आपल्या खोट्या हसण्यात दडवले होते.

त्या म्हणायच्या की, “प्रत्येकाच्या आयुष्यात अशी खूप दुःख असतात, जी कधीच दिसत नाहीत.” नलिनी यांना 1950 मध्ये आलेल्या ‘संग्राम’ चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. चित्रपटात यशस्वी ठरलेली अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात मात्र खूप दुःखी होती. त्यांनी दोन लग्नं केली होती. त्यांचा पहिले पती विरेंद्र देसाई दिग्दर्शक होते, तर दुसरे पती प्रभू दयाल अभिनेते होते. दोन लग्न केल्यानंतरही नलिनी आई होऊ शकल्या नाहीत. हेच त्यांच्या आयुष्यातील मोठे दुःख होते.

हेही पाहा- अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली, जॅकी श्रॉफकडून खाल्ली १७ वेळा कानाखाली । Jackie Slapped Anil Kapoor

चेंबूरच्या युनियन पार्कमध्ये त्यांचा भला मोठा आलिशान बंगला होता. ज्यामध्ये नेहमी पार्ट्या सुरू असायच्या. मात्र, नलिनी त्यांच्या शेवटच्या काळात प्रचंड एकाकी पडल्या होत्या. अनेक हिट चित्रपट देणार्‍या नलिनी यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अनेक दिवस आलिशान बंगल्यातच त्यांचा मृतदेह पडून होता. त्यांच्या मृत्यूची कल्पना शेजारच्यांनाही नव्हती. नलिनी यांचा मृत्यू 10 डिसेंबर, 2010 मध्ये झाला होता. त्यांचा अंत्यसंस्कारसुद्धा गोपनीय पद्धतीनेच पार पडला होता.

हेही  वाचा-

Latest Post